विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जेव्हा जेव्हा राहुल गांधींचा टीआरपी भारतात घसरतो, तेव्हा तेव्हा ते सावरकरांचा मुद्दा पुढे आणत असतात. असाच सावरकरांचा मुद्दा काँग्रेसने राहुल गांधींचा फोटो शेअर करत पुढे आणला आहे. Congress again insults Veer savarkar over rahul Gandhi’s apology
राहुल गांधींनी लंडनमध्ये भाषण करून भारतात लोकशाही नसल्याचा दावा केला होता. अमेरिका आणि युरोपियन देशांनी भारतात हस्तक्षेप करावा असा आग्रह धरला होता. या मुद्द्यावरून राहुल गांधींनी संसदेची माफी मागावी अशी भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत मांडली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने राहुल गांधींना आता कायदेशीर कायद्याच्या कचाट्यात अडकवून निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. राहुल गांधींनी माफी मागितली नाही, तर संसदीय समिती त्यांना निलंबित करण्याची शिफारस करू शकते.
त्यातच राहुल गांधी श्रीनगर मधल्या त्यांनीच केलेल्या भाषणाच्या मुद्द्यावर अडचणीत आले आहेत. श्रीनगर मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान भाषण करून त्यांनी तिथल्या महिलांचा बलात्काराचा मुद्दा समोर आणला होता. काही महिला राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत भेटल्या आणि आपल्या जवळच्या लोकांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याचा वेदना त्यांनी राहुल गांधींना सांगितल्या. श्रीनगर मधल्या जाहीर भाषणात त्यांनी या सर्व प्रकाराचा उल्लेख केला होता.
दिल्ली पोलिसांनी आता त्यांच्याकडे पीडित महिलांसंदर्भात चौकशी करत आहेत. राहुल गांधींकडे दिल्ली पोलीस तीनदा गेले. पण एकदाही राहुल गांधींनी पीडित महिला संदर्भात त्यांना माहिती दिली नाही. एकूणच हे प्रकरणाचा राहुल गांधींवर कायदेशीर दृष्ट्या शिकण्याची चिन्हे आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावरकरांच्या माफीचा मुद्दा पुढे आणत राहुल गांधींचा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे आणि फोटोला सावरकर समझा क्या… नाम राहुल गांधी है असे कॅप्शन दिले आहे. म्हणजेच राहुल गांधी एकतर कायदेशीर कचाट्यात अडकत आहेत, पण त्याचवेळी त्यांचा राजकीय टीआरपी घसरल्याने काँग्रेस सावरकरांचा मुद्दा पुढे करत राहुल गांधींचा टीआरपी सावरण्याचा प्रयत्न करीत आहे, असे दिसून येते.
भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात सुद्धा त्या यात्रेचा टीआरपी घसरला होता. तेव्हा अकोल्याच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीचा मुद्दा उपस्थित केला आणि राहुल गांधींचा + भारत जोडो यात्रेचा टीआरपी वाढला. असाच प्रकार त्यांनी आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर केला आहे.
Congress again insults Veer savarkar over rahul Gandhi’s apology
महत्वाच्या बातम्या