प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आव्हान द्यायला निघालेले दोन काँग्रेस पक्ष सध्या ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये भरणार आहे. Confusion among Congress leaders regarding the post of National President
या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर कन्फ्युजन आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आज पुन्हा शरद पवार यांचीच निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा महत्त्वाचा कार्यक्रम होता. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी एकमताने शरद पवार यांचीच पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली. पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी ट्विटर द्वारे ही माहिती दिली आहे.
काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत घराणेशाहीच्या मुद्द्यावर गांधी विरुद्ध नॉन गांधी असा परसेप्शनचा संघर्ष आहे. शशी थरूर यांच्यासह काँग्रेसच्या 5 खासदारांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतदार यादी मागितली आहे. राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होणार की नाही याविषयी पक्षात संभ्रम आहे. खुद्द त्यांनीच काल कन्याकुमारीत तसे वक्तव्य करून संभ्रम आणखीन वाढवला आहे. मी काँग्रेसचा अध्यक्ष होईन की नाही हे अध्यक्ष पदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळीच ठरेल, असे ते म्हणाले आहेत.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्हेट झाला असला तरी पक्षाध्यक्ष पदाच्या मुद्यावर मोठे कन्फ्युजन आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र घराणेशाहीच्या मुद्द्यावर तसे कन्फ्युजन न होता राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने शरद पवार यांचीच पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली आहे.
Confusion among Congress leaders regarding the post of National President
महत्वाच्या बातम्या
- शिंदे – फडणवीस सरकारचे गिफ्ट; महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना होणार लागू!
- पवारांशी जवळीक आणि नानांची ऑफर; गडकरींचे भाजप मधले वजन वाढवतील की घटवतील??
- काँग्रेसच्या यात्रेत नेसामोनी ख्रिश्चन कॉलेजात बैठक; राष्ट्रवादीच्या बैठकीत बिल्किस बानू प्रकरणी चिंता!
- यूजीसीचा निर्णय : दूर शिक्षण ऑनलाइन शिक्षणाच्या पदवीला मान्यता प्राप्त पदवीचेच महत्त्व!