Sunday, 11 May 2025
  • Download App
    तवांग मधला संघर्ष; सरकार उत्तर द्यायला तयार, पण काँग्रेसने संसदेत गोंधळ का घातला??; उलगडले रहस्य Conflict in Tawang; Govt ready to answer, but why did Congress create chaos in Parliament

    तवांग मधला संघर्ष; सरकार उत्तर द्यायला तयार, पण काँग्रेसने संसदेत गोंधळ का घातला??; उलगडले रहस्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 9 डिसेंबर 2022 रोजी चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेश मधल्या तवांगमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी प्रखर प्रतिकार करून चिनी सैनिकांची घुसखोरी रोखली. यात काही भारतीय सैनिक जखमी झाले. पण त्यांनी चिन्यांचे खूप मोठे नुकसान केले. त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे पळवून लावले. या संदर्भातल्या काही बातम्या काल 12 डिसेंबर 2022 रोजी रात्री आल्या. त्यावर काँग्रेसने काल रात्रीपासूनच काही गोंधळ सुरू केला होता.  Conflict in Tawang; Govt ready to answer, but why did Congress create chaos in Parliament

    वास्तविक तवांग मधल्या संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 13 डिसेंबर 2022 रोजी तातडीची बैठक घेऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. राजनाथ सिंह त्याबद्दल लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदनही करणार होते, तसे त्यांनी निवेदन केले देखील. तवांग मधल्या संघर्षाची सविस्तर माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली.

    मात्र हे सगळे होत असताना काँग्रेसने मात्र केवळ सरकारवर प्रश्न उपस्थित करून आणि सरकारला घेरून राजनाथ सिंह यांच्या उत्तरांमध्ये अडथळे आणले. याचे नेमके रहस्य काय होते?? काँग्रेसने प्रश्न तर उपस्थित केले, पण सरकारचे उत्तर ऐकून घ्यायला त्यांचे नेते तयार का नव्हते?? याचा थोडा आढावा घेतल्यावर एक वेगळीच बाब उघडकीस आली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रकाश टाकला.

    तो असा : प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये प्रश्न सूची मध्ये आज पाचव्या क्रमांकाचा प्रश्न होता, तो राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या विविध देणग्यांसंदर्भातला आणि त्यांच्या सोर्सेसचा. राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावासाने 1.35 कोटी रुपयांची देणगी दिली आहे, इतकेच नाही तर झाकीर नाईक यांच्यासारख्या दहशतवादी इस्लामी प्रचारकाने देखील राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी दिली आहे. या देणग्या विदेशी योगदान विनिमय कायद्याचा भंग करतात. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द केले आहे. लोकसभेतल्या प्रश्नकालात प्रश्न सूचित हा पाचव्या नंबरचा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेत देणार होते. हे स्वतः त्यांनीच नंतर जाहीर केले.

    परंतु संसदेत काँग्रेस नेत्यांनी गोंधळ घालून हा प्रश्नकालच होऊ दिला नाही. त्यामुळे अमित शाह यांना संसदेत राजीव गांधी फाउंडेशन संदर्भातले प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. परंतु अमित शहा यांनी संसदेबाहेर मात्र या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. यात त्यांनी वर उल्लेख केलेल्या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थित समाचार घेतला. राजीव गांधी फाऊंडेशनला यूपीए सरकारच्या काळात 2005 ते 2007 या दोन वर्षांमध्ये चिनी दूतावासाने 1.35 कोटी रुपयांची देणगी दिली आहे, इतकेच नाही तर झाकीर नाईक याच्या संस्थेने देखील राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी दिली आहे. हा खुलासा अमित शहा यांनी संसदेबाहेर केला. हाच खुलासा अमित शाह हे संस्थेत करणार होते. असे ते स्वतः म्हणाले.

    चिनी घुसखोरीचा मुद्दा काँग्रेसने संसदेत तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारचे उत्तर ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत काँग्रेसचे नेते नव्हते. पण ते का नव्हते, याचे रहस्य आजच्या संसदेतल्या प्रश्नकाळातल्या पाचव्या क्रमांकाच्या प्रश्नात दडल्याचे स्पष्ट होते.

    Conflict in Tawang; Govt ready to answer, but why did Congress create chaos in Parliament

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vadodara : वडोदरामध्ये पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज