वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात पीएफआयसारख्या संघटनेची १६ वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या संघटनेने २२ राज्यांत पाय पसरवले होते. भारतात मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना तयार करणे असा पीएफआयचा उद्देश होता. मुस्लिम ब्रदरहूडने वापरलेल्या पद्धत पीएफआयने संघटना वाढवण्यासाठी वापरल्या, अशी कबुली पीएफआयच्या अटकेतील १०० हून जास्त सदस्यांनी विविध तपास संस्थांसमोर दिली.Confessions of PFI members to investigative agencies Wanted to become an organization like the Muslim Brotherhood
सुरक्षा तपास अधिकाऱ्यांनी अटकेतील आरोपींची चौकशी केली. सोळा वर्षांपूर्वी दोन संघटनांच्या विलीनीकरणातून पीएफआयची स्थापना झाली. मुस्लिम ब्रदरहूड संघटनेच्या धर्तीवर ही संघटना कार्य करेल, असे त्याच वेळी ठरवण्यात आले होते. ही संघटना केरळ ते काश्मीरपर्यंत २२ राज्यांत पसरली आहे. या संघटनेच्या संकेतस्थळाची निर्मिती विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. संकेतस्थळ अगदी सामान्य दिसते.
गरिबांच्या मदतीसाठी काम करणारे व विशिष्ट समुदायाला एकत्र करण्याच्या उद्देशाने हे सुरू केल्याचे भासते. केंद्र सरकारने २८ सप्टेंबरला पीएफआयवर यूएपीए अंतर्गत पाच वर्षांसाठी बंदीचे आदेश दिले आहेत.
काय आहे मुस्लिम ब्रदरहूड?
कट्टर सुन्नी मुस्लिम संघटनेची स्थापना 1928 मध्ये इजिप्तमध्ये झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ही संघटना मध्यपूर्वेत पसरली. संघटनांचे युरोपसह उत्तर अमेरिकेतील अनेक देशांत कार्यालये आहेत.
Confessions of PFI members to investigative agencies Wanted to become an organization like the Muslim Brotherhood
महत्वाच्या बातम्या
- टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नामांतर आता वोडेयार एक्स्प्रेस!!; कर्नाटकात काॅंग्रेस नाराज
- सरसंघचालकांना प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले : मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये, आम्ही सर्वात जास्त कंडोम वापरतो
- द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेसाठी लकी राहिले धनुष्यबाण; ढाल तलवार, रेल्वे इंजिन आणि खजुराच्या झाडावर झाला पराभव
- PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट