• Download App
    भारतीय अर्थव्यवस्था सुधारणेसाठी ३ लाख कोटींच्या स्टिम्यूलस पॅकेजची सीआयआयची (CII) मागणी; मागणी वाढवा, अर्थव्यवस्था सुधारेल...!!। Confederation of Indian Industry (CII) called for Rs 3 lakh crore government stimulus to support the economy

    भारतीय अर्थव्यवस्था सुधारणेसाठी ३ लाख कोटींच्या स्टिम्यूलस पॅकेजची सीआयआयची (CII) मागणी; मागणी वाढवा, अर्थव्यवस्था सुधारेल…!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोविड काळात मोठा धक्का बसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सुधारणेसाठी ३ लाख कोटींच्या स्टिम्यूलस पॅकेजची गरज आहे. मागणी वाढली की अर्थव्यवस्था सुधारेल, असे प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघाचे Confederation of Indian Industry (CII) नवनिर्वाचित अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन यांनी केले आहे. Confederation of Indian Industry (CII) called for Rs 3 lakh crore government stimulus to support the economy



    सीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला अर्थव्यवस्था सुधारणेच्या दृष्टीने काही सूचना केल्या. ते म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्थेतल्या जीडीपीतला ६० टक्के वाटा मागणीवर आधारित आहे. बाजारातली मागणी वाढली की अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरूवात होईल. बाजारातील मागणी वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने काही उपाययोजना करण्याची गरज आहे.

    • आत्मनिर्भर भारत योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवावी.
    • सर्वसामान्य जनतेचा खिसा सध्या खाली झालाय. त्यांच्या जनधन खात्यांमध्ये काही रक्कम थेट भरून सरकारने कुटूंबांना मदत करावी.
    • मनरेगासाठी अर्थसंकल्पातील रक्कम वाढवावी.
    • जीएसटीमध्ये छोट्या कालावधीसाठी आणि विशिष्ट बाबींसाठी सूट द्यावी.
    • घर खरेदी करणाऱ्यांना विशिष्ट मुदतीची कर सवलत, व्याज सवलत, स्टँप ड्यूटीमध्ये सवलत अशा उपाययोजना कराव्यात. जेणे करून घर खरेदीदाराला आर्थिक आधार मिळेल. आणि गृहबांधणी क्षेत्रात मागणी वाढेल.
    • गेल्या वर्षीसारखी एलटीसी कॅश व्हाऊचर सुविधा चालू ठेवावी.
    • मागणी वाढली की ग्राहकाधारित वस्तूंचे उत्पादन आणि पुरवठा वाढेल. त्याचा अर्थव्यवस्था सुधारणेस मोठा लाभ होईल.
    • केंद्र सरकारने वरील मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून गरीब आणि मध्यम वर्गाला दिलासा द्यावा.

    Confederation of Indian Industry (CII) called for Rs 3 lakh crore government stimulus to support the economy

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!