विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या समोशामध्ये कंडोम, दगड, तंबाखू, गुटखा आदी पदार्थ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवीन कंत्राटदाराकडून केटरिंगचे कंत्राट मिळवण्यासाठी एका व्यावसायिकाने हे भीषण कृत्य रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. Condoms, stones, tobacco and gutkha found in samosas in Pune
कॅन्टीनचा ठेका संपुष्टात आल्याने आरोपी रहीम शेख संतापला असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅटॅलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ऑटोमोबाईल फर्मच्या म्हणण्यानुसार, समोस्यांचे कंत्राट एसआरएस एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीला देण्यात आले होते, या कंपनीने समोसा पुरवठा केला तेव्हा एक दिवस बॅण्डेज निघाले. त्यानंतर या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
त्यानंतर मनोहर एंटरप्रायझेस या दुसऱ्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. दुसऱ्या कंपनीला कंत्राट दिल्याने रहीम शेख संतापला, त्यानंतर कंपनीच्या मालकाकडून बदला घेण्यासाठी त्याने कट रचला. यानंतर रहिम शेखने आपल्या दोन कर्मचाऱ्यांना मनोहर एंटरप्रायझेसच्या कॅन्टीनमध्ये दाखल करून घेतले. हे कर्मचारी फिरोज शेख आणि विकी शेख यांनी कंडोम, तंबाखू आणि दगड असलेले समोसे तयार केले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी समोसे उघडले असता त्यात आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या. यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सर्व आरोपींविरुद्ध आयपीसी कलम आणि १२०बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते पुढे म्हणाले की, दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते एसआरएस एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या मालकाने त्यांना मनोहर एंटरप्रायझेसने पुरवलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी पाठवले होते. रहीम शेख, अजहर शेख आणि मजहर शेख अशी मालकांची ओळख पटली आहे. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली आहे.
Condoms, stones, tobacco and gutkha found in samosas in Pune
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेत्यांशी संबंधित संघटना RSSच्या नावाचा करत आहे गैरवापर – भाजपचा आरोप!
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; इनाम असलेल्या तिघांसह १२ नक्षलवाद्यांना अटक!
- भाजपने केली मोठी मागणी! बंगालमध्ये निवडणुकीनंतरही केंद्रीय सुरक्षा दल तैनात ठेवावे
- उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकर “सेफ गेम”साठी मैदानात; पण ईडीच्या नोटीशी पुढे मुलगा टिकेल का निवडणुकीत??