• Download App
    लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी। Comprehensive Guidelines for Management of COVID-19 in Children

    लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाबाधित लहान मुलांच्या उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध केली आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहे. Comprehensive Guidelines for Management of COVID-19 in Children

    आरोग्य मंत्रालयाच्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस केलेली नाही. तसेच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा ,असंही स्पष्ट केले आहे.

    “लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस नाही. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे,” असे सांगितले आहे. दरम्यान यावेळी १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटे चालण्याची शिफारस केली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस नाही.



    कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जावी, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असेही सांगितले आहे.

    लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य करोना केसेसमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरु शकतात .यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे. “स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत,” असं मार्गदर्शक तत्वात म्हंटले आहे.

    स्टिरॉईड मुळे काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होत आहे. तसंच पाच वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका आणि सहा ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत असं सांगितले आहे. दरम्यान, अत्यंत गरज असेल तरच कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी सल्ला द्यावा.

    Comprehensive Guidelines for Management of COVID-19 in Children

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले