प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे शिवसेना आणि भाजप या दोन माजी मित्रपक्षांमध्ये विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून राजकीय घमासान सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने महाराष्ट्रातल्या आमदार निधी वाटपातील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. आज यापुढे जाऊन आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून काही विशिष्ट गोष्टींवर चर्चा केल्याची माहिती काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.Complaints of Congress on distribution of MLA funds
सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करणे याचा अर्थ पडद्यामागे काही विशिष्ट हालचाली सुरू आहेत. या स्वरूपाने या गोष्टीकडे पाहिले गेले आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. काँग्रेसच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय झाला आहे या विषयीची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती. आपण स्वतः या विषयात लक्ष घालून कॉंग्रेस आमदारांना अधिक निधी मिळेल हे पाहू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे नाना पटोले यांनी नंतर सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करणे आणि त्यांच्याशी काही विशिष्ट विषयांवर चर्चा करणे याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.
आमदार निधी वाटपात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिल्याचा बातम्या सुमारे महिनाभरापूर्वी आल्या होत्या. या संदर्भातील आकडेवारी देखील त्या बातम्यांमध्ये देण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदारांना काँग्रेस आमदारांची पेक्षा दुप्पट निधी मिळाल्याचे दिसत होते, तसेच शिवसेनेचे आमदार देखील कमी निधीचे धनी झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून या विषयात लक्ष घालण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळा राजकीय संदेश दिल्याचे मानण्यात येत आहे…!!
Complaints of Congress on distribution of MLA funds
महत्त्वाच्या बातम्या
- कोर्लई गावात शिवसैनिक – भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने ; खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांची रश्मी ठाकरेंशीही गद्दारी!!; सोमय्यांचा नवा आरोप
- शिवसेना नेतृत्वाचा भाजपशी पंगा; शिवसैनिकांची राष्ट्रवादीशी झुंज…!!
- FARHAN WEDS SHIBANI : मराठमोळ्या पद्धतीने होणार फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं लग्न ; खंडाळ्यात रंगणार सोहळा
- शिवजयंती मिरवणूक यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द