विशेष प्रतिनिधी
बीड : सिनेअभिनेत्री करिना कपूर व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात बायबल हा शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना जाणूनबुजून दुखावल्याची तक्रार करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे.Complaint filed against actress Kareena Kapoor for hurting the feelings of Christians
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना निवेदन पाठवून कलम २९५- अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पाच दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात बायबल हा शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना जाणूनबुजून दुखावल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रेग्नसी बायबल या पुस्तकात ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ बायबलचे नाव वापरले आहे ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा पवित्र ग्रंथ आहे.
त्यामुळे या पुस्तकावरील बायबल हा शब्द तत्काळ हटवावा.अभिनेत्री करिना कपूर, आदिती शहा व प्रकाशकांनी ख्रिश्चन समाजाची माफी मागावी, अशी मागणी शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मॅथ्यू जोसेफ, नितीन शिंदे, ब्रदर अरूण गायकवाड, मरियन रेड्डी, किशोर पाटील यांनी केली आहे.
तक्रारीत तात्काळ २९५-अ नूसार त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल झाली आहे मात्र अद्याप एफआयआर नोंदविला नसल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.
दोन मुलांची आई असलेल्या ४० वर्षीय करीनाने हे पुस्तक म्हणजे आपले तिसरे मुल असल्याचे म्हटले आहे. ९ जुलै रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे जोरदार प्रमोशनही करण्यात येत आहे. आपल्या दोन्ही बाळंतपणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक पातळीवर आलेले अनुभव या पुस्तकात मांडले असल्याचे करीनाने म्हटले आहे.
Complaint filed against actress Kareena Kapoor for hurting the feelings of Christians
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन