• Download App
    पवार कुटुंबात वाढली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा; पण अजितदादांना अर्थ खाते टिकण्याची सतावतेय चिंता!! Competition for the post of chief minister increased in the Pawar family

    पवार कुटुंबात वाढली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा; पण अजितदादांना अर्थ खाते टिकण्याची सतावतेय चिंता!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एकीकडे पवार कुटुंबातच मुख्यमंत्री पदाची वाढली स्पर्धा; पण दुसरीकडे अजितदादांना अर्थ खाते टिकण्याची सतावतेय चिंता!!, अशी स्थिती आली आहे. Competition for the post of chief minister increased in the Pawar family

    राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपापले नेतेच मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत उतरवले. त्यातही अजित पवार, सुप्रिया सुळे आणि त्या पाठोपाठ रोहित पवारांचेही फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर झळकले. त्यातून पवार कुटुंबातच मुख्यमंत्री पदाची स्पर्धा कार्यकर्त्यांनी लावल्याचे दिसून आले.

    पण एकीकडे असे गुडघ्याला बाशिंग बांधणारे मुख्यमंत्री तयार होत असताना दुसरीकडे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या अजित पवारांना मात्र भाजपने आपल्याला दिलेले महाराष्ट्राचे अर्थ मंत्रालय टिकून राहील की नाही??, याविषयी चिंता वाटते आहे. ही चिंता त्यांनी स्वतःच बारामतीत बोलून दाखवली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकाल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मुंबईतल्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. या दोन्ही नेत्यांनी अमित शहा यांच्या समवेत बंद दाराआड चर्चा देखील केली.

    पण अजित पवार अमित शाहांच्या दौऱ्याच्या वेळी उपस्थित नव्हते. ते आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीत होते. बारामतीतील वेगवेगळ्या प्रकारच्या पाच बैठका घेतल्या. बारामतीत 42 कोटींचे क्रीडा संकुल बांधले जात आहे. त्याचा आढावा घेतला. त्यात बोलताना अजित पवारांनी अर्थ खाते आपल्याकडे टिकेल की नाही??, याविषयी शंका व्यक्त केली. सध्या अर्थ खाते आपल्याकडे असल्यामुळे बारामतीला झुकते माप देता येते, पण हे अर्थ खाते आपल्याकडे कितीपत टिकेल याविषयी शंका वाटते म्हणून लवकर कामे करून घ्या, असे अजित पवार म्हणाल्याच्या बातम्या आल्या.

    भाजप मधले माजी मंत्री आणि सध्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला डावलले जात असल्याची भावना अजित पवारांच्या मनात बळावत चालली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

    म्हणजे एकीकडे पवार कुटुंबातच भावी मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा वाढीस लागली आहे, तर दुसरीकडे अजितदादांना भाजपने दिलेले अर्थ खातेच आपल्याकडे टिकून राहील की नाही??, याविषयीची चिंता सतावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

    Competition for the post of chief minister increased in the Pawar family

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!