• Download App
    राहुल गांधींची रामाशी तुलना; सलमान खुर्शीदांकडून वक्तव्याचे पुन्हा समर्थन Comparison of Rahul Gandhi with Rama; Re-endorsing the statement by Salman Khurshid

    राहुल गांधींची रामाशी तुलना; सलमान खुर्शीदांकडून वक्तव्याचे पुन्हा समर्थन

    वृत्तसंस्था

    गाजियाबाद : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले खासदार राहुल गांधी यांची तुलना माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांनी भगवान रामाशी केली. त्यावर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटली. त्यानंतरही सलमान खुर्शीदांनी आपल्या वक्त्याचे समर्थन केले आहे. Comparison of Rahul Gandhi with Rama; Re-endorsing the statement by Salman Khurshid

    देवाशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. मी कुणाचीही देवाशी तुलना केली नाही. पण जो देवाच्या मार्गाने चालला आहे, त्याची स्तुती मी जरूर करणार. जर कोणामध्ये आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम दिसले, तर मी त्यांची तारीफ करायची नाही का?? की एकाच पक्षाला मर्यादा पुरुषोत्तमाचे नाव घ्यायची परवानगी आहे??, असा सवाल करून सलमान खुर्शीद यांनी भाजप नेत्यांना टोचत आपल्या आधीच्या वक्तव्याचे समर्थन केले.

    सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य काय?

    सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना राहुल गांधींची तुलना भगवान रामाशी केली होती. राहुल गांधी हे सुपर ह्युमन आहेत. आम्ही सर्वजण कडाक्याच्या थंडीत कुडकुडत असताना ते फक्त टी-शर्ट घालून देशभरात भारत जोडो यात्रेत हिंडत आहेत. एखाद्या योग्यासारखी ते तपस्या करत आहेत. भरताने भगवान रामांच्या खडावा आधी अयोध्येत आणल्या होत्या. त्यानंतर राम अयोध्येत आले. तशाच आम्ही आधी राहुल गांधींच्या खडावा उत्तर प्रदेशात आणल्यात. त्या पाठोपाठ आमचे राम राहुल गांधी हे देखील उत्तर प्रदेशात येतील, अशी शब्दफुले सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्यावर उधळली होती.

    राहुल गांधींना सुपर ह्यूमन म्हणण्यापर्यंत ठीक आहे. पण त्यांची तुलना थेट भगवान राम यांच्याशी करणे हे जनेऊधारी राहुल गांधी यांना तरी पटेल का?, असा खोचक सवाल भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला.

    आत्तापर्यंत काँग्रेसने रामाचे अस्तित्व देखील नाकारले होते. सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमी केस मध्ये रामाला काल्पनिक पात्र म्हटले होते, तेच आता आपल्या नेत्याची तुलना रामाशी करताहेत आणि त्यांच्या खडवांचे पूजन करताहेत, असा टोलाही पुनावाला यांनी लगावला.

    मात्र, भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतरही सलमान खुर्शीद यांनी आपल्या आधीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

    Comparison of Rahul Gandhi with Rama; Re-endorsing the statement by Salman Khurshid

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोठी बातमी! अमृतसरमधून दोन ISI हेरांना अटक

    Pakistan पाकिस्तानच्या युद्धाच्या पोकळ धमक्या; पण त्या देशात फक्त 96 तास पुरेल एवढाच दारूगोळ्याचा साठा!!

    सत्काराकडे पाठ फिरवून 5 माजी मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम”; एक विद्यमान आणि दोनच माजी मुख्यमंत्री हजर!!

    Icon News Hub