विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातली आजची आकडेवारी पाहिली तर त्रिपुरा, मणिपूर, छत्तीसगड यांच्यासारखी छोटी राज्य निघून गेली पुढे आणि पुरोगामी बडबड करणारा महाराष्ट्र मतदानात राहिला मागे, असेच म्हणायची वेळ आली आहे!! मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी पाहिली, तर ती दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान देखील सुधारलेली नव्हती. इतर 12 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मतदानात मागेच राहिला होता. Compared to 12 states, Maharashtra lagged behind in the polls.
महाराष्ट्राने देशाला नेहमीच पुरोगामी विचार दिला. देशाचे राजकीय सामाजिक प्रबोधन केले, अशा बढाया महाराष्ट्रातले पुरोगामी विचारवंत मारतात, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र महाराष्ट्र किती मागे आहे, याचा आकडेवारीचा लख्ख आरसा बघायचा नाकारतात, हेच मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पुरोगामी महाराष्ट्राचे डोळे उघडणारी आहे, पण पुढच्या 4 – 5 तासांमध्ये महाराष्ट्र डोळे उघडणार का की तसेच झाकून ठेवणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– वाचा आकडेवारी, कोणत्या राज्यात किती मतदान??
त्रिपुरा – 54.47 %
छत्तीसगड – 53.09 %
मणिपूर – 54.26 %
पश्चिम बंगाल – 31.25 %
मध्य प्रदेश – 38.96 %
आसाम – 46.31 %
राजस्थान – 40.39 %
जम्मू-काश्मीर – 42.88 %
केरळ – 39.26 %
उत्तर प्रदेश – 35.73 %
कर्नाटक – 38.23 %
बिहार – 33.80 %
महाराष्ट्र – 31.77 %
– महाराष्ट्रातले 1.00 वाजेपर्यंतचे मतदान
परभणी – 21.77 %
बुलढाणा – 17.92 %
यवतमाळ-वाशिम – 18.01 %
नांदेड – 20.85 %
अकोला – 17.37 %
वर्धा – 18.35 %
अमरावती – 17.73 %
हिंगोली – 18.19 %
Compared to 12 states, Maharashtra lagged behind in the polls.
महत्वाच्या बातम्या
- कल्पना सोरेन यांचे सक्रीय राजकारणात पदार्पण! ‘या’ विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार
- लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांच्या 88 जागांवर मतदान!
- फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!!
- ‘बांगलादेशची प्रगती पाहून आम्हाला लाज वाटते’ ; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं विधान!