• Download App
    हिणवलेल्या जन धन बॅंक खात्यांमध्ये सामान्यांनी जमा केले तब्बल दोन लाख कोटी रुपये!Common people have deposited almost two lakh crore rupees in Jan Dhan Bank accounts

    हिणवलेल्या जन धन बॅंक खात्यांमध्ये सामान्यांनी जमा केले तब्बल दोन लाख कोटी रुपये!

    देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि कार्यावर विश्वास दर्शवल्याचं वेळोवेळी सिद्ध होत आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत मूलभूत बँक खात्यांमधील एकूण शिल्लक रक्कमेने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.  खरंतर या योजनेला विरोधकांकडून हिणवलं गेलं होतं. एवढच नाही तर ही योजना मोदी सरकारची नसून ती मुळात यूपीए आघाडीचीच आहे, तिचं केवळ नाव बदललं आणि ती लोकांमसोर आणली असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि कार्यावर विश्वास दर्शवल्याचं वेळोवेळी सिद्ध होत आहे. परिणामी एवढी मोठी रक्कम या योजनेअंतर्गत बँक खात्यांमध्ये लोकांनी जमा केली आहे. Common people have deposited almost two lakh crore rupees in Jan Dhan Bank accounts

    ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलपर्यंत खात्यातील एकूण शिल्लक 2,01,598 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 48.70 कोटी लाभार्थी आहेत, त्यापैकी 27.08 कोटी महिला आहेत. आरबीआयची शाखा असणाऱ्या इन्स्टिटय़ूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी (IDRBT) चे संचालक डी जानकीराम म्हणाले, “PM जन धन योजनेच्या (PMJDY) माध्यमातून आर्थिक समावेशाच्या प्रवासातील हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, जी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. नवीन खाती आणि या खात्यांमधील ठेवी या दोन्ही बाबतीत या योजनेने अभूतपूर्व यश मिळविले आहे.

    PMJDY च्या यशाचा फायदा क्रेडिट स्कोअरिंगमध्ये नावीन्य आणण्यासाठी, डिजिटल व्यवहारांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, या खात्यांच्या आर्थिक घडामोडींशी क्रेडिट सुविधा जोडणे आणि UPI व्यवहार प्रवाहाद्वारे समाजातील सर्वात उपेक्षित घटकांपर्यंत आर्थिक सेवांचा विस्तार केला जाऊ शकतो. “या खात्यांद्वारे क्रेडिटमध्ये प्रवेश करणे हे पीएम जन धन खात्यांना पीएम जन धन वृद्धी खात्यांमध्ये रूपांतरित करण्याचे पुढील मोठे पाऊल आहे.” असंही जानकीराम म्हणाले आहेत.

    PMJDY ने 15 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झाल्यापासून बराच पल्ला गाठला आहे आणि आता ही जगातील सर्वात मोठी आर्थिक समावेशन योजना म्हणून ओळखली जाते. जुलै 2019 मध्ये 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी जवळपास पाच वर्षे लागली होती.

    Common people have deposited almost two lakh crore rupees in Jan Dhan Bank accounts

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!