वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय ऑईल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरचे दर नववर्षाच्या पहिल्या दिनी 102.50 रुपयांनी कमी केले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट स्ट्रीट फुड व्यावसायिकांसाठी यातून मोठा दिलासा मिळाला आहे. Commercial gas cylinder price reduced by Rs 102.50; Consolation to hotel, restaurant, street food professionals
दोनच महिन्यांपूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 100 रुपयांनी वाढवण्यात आले होते त्यामुळे कमर्शियल गॅस सिलेंङर 2200 रुपयांवर पोहोचला होता. परंतु आता 102.50 रुपयांनी दर कमी केल्यामुळे तो आता 1998 रुपयांच्या आसपास उपलब्ध होणार आहे. 19 किलोच्या गॅस सिलेंडरचे हे दर आहेत. विविध शहरांच्या पत्रिकेनुसार त्यात काही अंशी कमी जास्त फरक पडू शकतो.
परंतु सर्वसाधारणपणे 102.50 रुपयांनी 19 किलोच्या गॅस सिलेंडरचे दर घटले आहेत. 14, 10 आणि 5 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे चे दर स्थिर आहेत. ते घटविल्याची घोषणा केलेली नाही.
Commercial gas cylinder price reduced by Rs 102.50; Consolation to hotel, restaurant, street food professionals
महत्त्वाच्या बातम्या
- माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी, मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना व जखमींना पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा
- मुंबईत रिअल इस्टेटची झेप, मालमत्ता खरेदीत विक्रम, एक लाखांपेक्षा अधिक खरेदी विक्रीचे व्यवहार
- एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार; मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये