• Download App
    मणिपूरमध्ये कुकी दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर परिवारासह शहीद । Commanding officer of Assam Rifles along with his family martyred in cookie attack in Manipur

    मणिपूरमध्ये कुकी दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर परिवारासह शहीद

    वृत्तसंस्था

    इम्फाळ : मणिपूर मध्ये म्यानमार बॉर्डर जवळ चंदचुरा जिल्ह्यात सिंगनगट गावाच्या जवळ कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी हे आपल्या परिवारासह शहीद झाले आहेत. Commanding officer of Assam Rifles along with his family martyred in cookie attack in Manipur

    कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या तुकड्यांचा मागोवा घेत आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. आसाम रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराचा जबरदस्त मुकाबला केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.



    मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी हे त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह शहीद झाले. यानंतर आसाम रायफल्स आणि अन्य सुरक्षा दलांनी एकत्रितपणे परिसराचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्याच बरोबर शहीद परिवाराच्या नातेवाईकांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही दिले आहे.

    कुकी दहशतवादी सुरक्षा दलांचा मागोवा घेत त्यांच्यावर काही ठिकाणी हल्ले करताना आढळले आहेत. आजचा हात सुरक्षा दलांवरचा सगळ्यात मोठा हल्ला होता. यामध्ये आसाम रायफलच्या कमांडिंग ऑफिसरला आपल्या परिवारासह प्राण गमवावे लागले आहेत.

    Commanding officer of Assam Rifles along with his family martyred in cookie attack in Manipur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!