पंतप्रधान मोदींविरोधात दाखल केला होता अर्ज Comedian Shyam Rangelas application from Varanasi was cancelled
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध विनोदी कलाकार श्याम रंगीला यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. स्वतः श्याम रंगीला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदींचा वाराणसीमध्ये भव्य रोड शो, जनतेचा भरघोस प्रतिसाद!
श्याम रंगीला यांनी नामांकन रद्द झाल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून दिली. श्याम रंगीला यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हे स्पष्ट झाले आहे.
श्याम रंगीला यांनी म्हटलं की जीव तुटतं आहे नक्कीच, पण हिंमत नाही हरलोय. तुमच्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रसारमाध्यमांना आवाहन करताना ते म्हणाले की, कृपया आता फोन करू नका, जी काही माहिती मिळेल, ती मी येथे देत राहीन.