• Download App
    प्रसिद्ध कॉमेडियन संकेत भोसलेवर पंजाबात गुन्हा दाखल, लग्नात गर्दी जमवल्याचा आरोप, काही दिवसांपूर्वीच केली होती राहुल गांधींची खिल्ली उडवणारी जाहिरात । Comedian Sanket Bhosale booked for violating Covid-19 norms in Punjab, Earlier featured in ad mocking Rahul Gandhi

    प्रसिद्ध कॉमेडियन संकेत भोसलेवर पंजाबात गुन्हा, लग्नात गर्दी जमवल्याचा आरोप, काही दिवसांपूर्वीच केली होती राहुल गांधींची खिल्ली उडवणारी जाहिरात

    Comedian Sanket Bhosale : प्रसिद्ध कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचे 26 एप्रिल रोजी पंजाबच्या फगवारा येथील क्लब कॅबाना रिसॉर्टमध्ये पारंपरिक रीतीने लग्न झाले. परंतु हेच लग्न आता वादात सापडले आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघटन करून लग्नात गर्दी जमवल्याचा आरोप करत या नवदांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांच्या या कारवाईने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही कारवाई सूडापोटी केल्याचीही चर्चा आता होत आहे. Comedian Sanket Bhosale booked for violating Covid-19 norms in Punjab, Earlier featured in ad mocking Rahul Gandhi 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचे 26 एप्रिल रोजी पंजाबच्या फगवारा येथील क्लब कॅबाना रिसॉर्टमध्ये पारंपरिक रीतीने लग्न झाले. परंतु हेच लग्न आता वादात सापडले आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघटन करून लग्नात गर्दी जमवल्याचा आरोप करत या नवदांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांच्या या कारवाईने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही कारवाई सूडापोटी केल्याचीही चर्चा आता होत आहे.

    काय आहे प्रकरण?

    कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचे दि. 26 एप्रिल रोजी पंजाबच्या फगवारा येथे लग्न झाले. या लग्नाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंजाबात सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू आहेत. लग्न सोहळ्यांसाठीही खास नियम आहेत. असे असतानाही संकेत भोसलेंच्या लग्नात गर्दी जमल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली आहे.

    काय सुरू आहे चर्चा?

    काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन संकेत भोसलेने स्टोरिया या फूड कंपनीच्या एका जाहिरातीत काम केले होते. ही जाहिरात राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांची खिल्ली उडवणारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या जाहिरातीविरोधात मुंबई स्टोरियाच्या ऑफिसमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली होती. आता पंजाबमध्ये सध्या काँग्रेस सरकार आहे. यामुळेच सूड उगवण्यासाठी कॉमेडियन संकेत भोसलेवर कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.

    हीच आहे ती वादग्रस्त जाहिरात (साभार: ऑपइंडिया)

    स्थानिक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 188 आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी केवळ वधू सुगंधा आणि वर यांच्यावरच नव्हे, तर ज्या रिसॉर्टमध्ये लग्न केले होते त्या संपूर्ण व्यवस्थापन व लग्नाला आलेल्या सर्व लोकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक केल्याचे वृत्त नाही.

    Comedian Sanket Bhosale booked for violating Covid-19 norms in Punjab, Earlier featured in ad mocking Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक