विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : बजरंग दलाकडून मिळालेल्या धमकीमुळे मुंबई मधील बरेच स्टँड अप कॉमेडीचे शो कॅन्सल करण्यात अाले हाेते. याच पाश्र्वभूमीवर बेंगलोर पाेलिसांनी कॉमेडियन मुन्नावर फारुकी याचा शो देखील कँन्सल केला आहे. हा शो बेंगळूरुमध्ये होणार होता. कायदा आणि सुव्यवस्था हे कारण देत हा शो कॅन्सल करण्यात आला आहे.
Comedian Munnawar Farooqi’s stand up comedy show canceled in Bangalore
या निर्णयानंतर फारुकीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ‘हेट वन, अँड आर्टिस्ट लॉस्ट. धिस इज एनजस्टिस’ या शब्दामध्ये आपला खेद व्यक्त केला आहे.
देशातील बऱयाच राज्यांमध्ये फारुखचे शो कँन्सल करण्यात आले आहेत. कारण त्याने हिंदू देवी देवतांचा अपमान केला होता असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बँगलोरमधील गुड शेफर्ड ऑडिटोरियम मधील त्याचा शो कँन्सल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला एक ‘कॉन्ट्रोवर्शियल फिगर’ म्हणून संबोधित केले आहे. मध्य प्रदेशमध्ये काही लोकांनी हिंदू देव देवतांचा अपमान केल्या प्रकरणी त्याच्यावर केस देखील दाखल केलेली आहे.
Comedian Munnawar Farooqi’s stand up comedy show canceled in Bangalore
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा
- युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल
- अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका