मोदीद्वेषाने पछाडलेल्यंपैकी एक असलेल्या कुणाल कामराने निर्लज्जतेचा कळस गाठत एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ एडिट करून आपल्या ट्विटरवर टाकला. हा मुलगा म्हणत असलेले देशभक्तीपर गाणे काढून टाकून त्याऐवजी पिपली लाइव्ह सिनेमातील महँगाई डायन खाई जात है हे गाणे टाकले होते. या मुलाच्या वडीलांनी कामराची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगानेही कामरावर कारवाईची मागणी केली आहे. Comedian Kunal Kamara’s shamelessness, patriotic song-singing video of seven-year-old boy edited
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदीद्वेषाने पछाडलेल्यंपैकी एक असलेल्या कुणाल कामराने निर्लज्जतेचा कळस गाठत एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ एडिट करून आपल्या ट्विटरवर टाकला. हा मुलगा म्हणत असलेले देशभक्तीपर गाणे काढून टाकून त्याऐवजी पिपली लाइव्ह सिनेमातील महँगाई डायन खाई जात है हे गाणे टाकले होते. या मुलाच्या वडीलांनी कामराची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगानेही कामरावर कारवाईची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बर्लिनच्या दौऱ्यावर होते. या वेळी एका लहान मुलाने मोदींसमोर एक देशभक्तिपर गाणे गायले. त्यावर मोदींनीही त्या लहानग्याचं कौतुक केलं. त्या मुलाचा गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, कुणाल कामराने हाच व्हिडिओ एडिट करून आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला.
त्या लहान मुलाच्या वडिलांनी एडिटेड व्हिडिओ टाकल्यावरून कुणाल कामराला ट्विटरद्वारे चांगलेच फटकारले आहे. तो माझा सात वर्षांचा मुलगा आहे, ज्याला त्याच्या प्रिय मातृभूमीसाठी गाण्याची इच्छा होती. तो अजून लहान असला तरी, त्याचे देशावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. मिस्टर कामरा किंवा कचरा, तुम्ही काहीही असाल. पण निरागस मुलाला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवा आणि तुमच्या वाईट विनोदांवर काम करण्याचा प्रयत्न करा.
व्हिडिओ एडिट केल्याप्रकरणी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानेही (एनसीपीसीआर) दखल घेत ट्विटरकडे तक्रार केली आहे. शिवाय दिल्ली पोलिसांकडेही पत्र लिहून कामरावर कारवाई करण्याची मागणी आयोगाने केली आहे. आयोगाने ट्विटरला कुणाल कामरा याच्या अकाउंटवर कारवाई करण्याची आणि व्हिडिओ तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे. राजकीय विचारसरणीसाठी अल्पवयीन मुलाचा वापर करणे बेकायदेशीर आहे आणि बालकायदा २०१५ चे उल्लंघन आहे, असेही एनसीपीसीआरने तक्रारीत म्हटले आहे.
प्रचंड टीका झाल्यानंतर कामराने अखेर तो व्हिडिओ गुरुवारी डिलिट केला आहे. त्याने शेअर केलेला व्हिडिओ त्याच मुलाचा होता ज्याने पंतप्रधान मोदींसमोर देशभक्तिपर गाणे गायले होते; परंतु व्हिडिओ एडिट केला होता.
Comedian Kunal Kamara’s shamelessness, patriotic song-singing video of seven-year-old boy edited
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : कायदेशीर ससेमिरा!!; सांगली पाठोपाठ परळी कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट!!
- आत्महत्या करणारे 1000 शेतकरी, 135 एसटी कर्मचारी हे बहुजन नव्हते का??; पडळकरांचा राऊतांना सवाल!!
- ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, कोरोनाच्या लाटेनंतर सीएए लागू होणारच, अमित शाह यांनी ठणकावले
- काश्मीरचा वरचष्मा होणार कमी, विधानसभेत वाढल्या जम्मूमधील जागा