• Download App
    Shashi Tharoor शशी थरूर यांची मोहीम यशस्वी; कोलंबियाने पाकिस्तानला पाठविलेला दुखवटा संदेश घेतला मागे!!

    Shashi Tharoor शशी थरूर यांची मोहीम यशस्वी; कोलंबियाने पाकिस्तानला पाठविलेला दुखवटा संदेश घेतला मागे!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारताने केलेल्या operation sindoor मोहिमेची माहिती सगळ्या जगाला देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळे जगभरातल्या 33 देशांमध्ये पाठवली. त्याचा सकारात्मक परिणाम समोर यायला लागलाय. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तागडीत तोलण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आणि त्याचा नॅरेटिव्ह उद्ध्वस्त व्हायला लागलाय. याचे प्रत्यंतर कोलंबिया मध्ये आले. Shashi Tharoor

    ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानातल्या 9 ठिकाणांवर हल्ले करून. 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर कोलंबिया देशाने पाकिस्तानला जीवित हानी झाल्याबद्दल दुखवटा संदेश पाठवला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध लवकर थांबावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण भारताच्या दृष्टीने पाकिस्तानमधील जीवित हानी हे सर्वसामान्यांची नव्हती, तर भारताने तिथले दहशतवादी मारलेत. त्यामुळे पाकिस्तानला कोणी दुखवटा संदेश पाठविणे भारताला मान्य झाले नाही. कोलंबियाने पाकिस्तानला दुखवटा संदेश पाठवल्याबद्दल शशी थरूर यांनी देशात जाऊन नाराजी व्यक्त केली.



    Operation sindoor दरम्यान पाकिस्तानने मात्र भारतीय नागरी ठिकाणांवर हल्ले केले. सर्वसामान्य नागरिकांची घरे उद्ध्वस्त केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या या कारवाईचा फरक काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी कोलंबिया या प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. कोलंबियामध्ये सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि अधिकारी त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांची संपर्क साधला. त्यांना भारताची भूमिका पटवून दिली. त्यानंतर कोलंबियाने एक महत्त्वाचा राजनैतिक निर्णय घेऊन पाकिस्तानला पाठवलेला दुखवटा संदेश मागे घेतला.

    – ट्रम्प प्रशासनाला चपराक

    कोलंबियाने या राजनैतिक निर्णयातून अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला देखील वेगळा धक्का दिला. कारण ट्रम्प प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तागडीत तोलून दोन्ही देशांमधल्या न झालेल्या शस्त्रसंधीचे क्रेडिट घेतले होते. कोलंबियाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या कारवाईतला मुख्य भेद समजून घेतला आणि त्यानुसार दुखवटा संदेश मागे घेण्याची उचित कारवाई केली. न्यायाची भूमिका घेतली. ही अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला खऱ्या अर्थाने चपराक ठरली.

    Colombia withdraws condolence statement to Pakistan after Op Sindoor following diplomatic – Shashi Tharoor

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    200 कोटींच्या डिजिटल टोळीच्या प्रमुखाला सुरतेत अटक; एकाच खात्यातून एका दिवसात 42 कोटींच्या व्यवहारानंतर पर्दाफाश

    नोबेल पुरस्कार विजेत्याचा हिंसक चेहरा; शेख हसीनांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा घातक इरादा!!

    Kejriwal : केजरीवाल सोनीपत न्यायालयात अनुपस्थित; दिल्लीचे वकीलही पोहोचले नाहीत, ऑक्टोबरमध्ये सुनावणी