• Download App
    देशातील महाविद्यालये ठरवू शकणार स्वतःचे अभ्यासक्रम; UGC ची सुधारित नियमांना मंजुरीColleges in the country can decide their own courses

    देशातील महाविद्यालये ठरवू शकणार स्वतःचे अभ्यासक्रम; UGC ची सुधारित नियमांना मंजुरी

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याविषयीच्या सुधारित नियमांना केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने मंजुरी दिली आहे. Colleges in the country can decide their own courses

    त्यामुळे आता देशभरातील मान्यताप्राप्त महाविद्यालये स्वतःच्या पसंती आणि गरजेनुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, सध्याच्या अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करून पुनर्रचना करणे, परीक्षा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी नवीन पद्धती अवलंबणे, आदी गोष्टी आपल्या स्तरावर करू शकतील. या शिवाय सरकारने लागू केलेल्या आरक्षण धोरणातील नियमानुसार, प्रवेशाचा नियमही तयार करू शकतील.

    संबंधित अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्याचा अधिकारही महाविद्यालयांनाच देण्यात आला आहे. त्याअंतर्गत आता संलग्न महाविद्यालये शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तेसाठी यूजीसीकडे थेट अर्ज करू शकणार असून, स्वायत्ततेच्या नव्या नियमावलीवर 25 ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवता येतील. सुधारित नियमांमुळे महाविद्यालाये आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. स्वायत्त महाविद्यालयांवर देखरेख करण्यासाठी आयक्यूएसी सेल बनवण्यात येईल. त्याचा अहवाल वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.

    Colleges in the country can decide their own courses

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत