प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याविषयीच्या सुधारित नियमांना केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने मंजुरी दिली आहे. Colleges in the country can decide their own courses
त्यामुळे आता देशभरातील मान्यताप्राप्त महाविद्यालये स्वतःच्या पसंती आणि गरजेनुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, सध्याच्या अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करून पुनर्रचना करणे, परीक्षा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी नवीन पद्धती अवलंबणे, आदी गोष्टी आपल्या स्तरावर करू शकतील. या शिवाय सरकारने लागू केलेल्या आरक्षण धोरणातील नियमानुसार, प्रवेशाचा नियमही तयार करू शकतील.
संबंधित अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्याचा अधिकारही महाविद्यालयांनाच देण्यात आला आहे. त्याअंतर्गत आता संलग्न महाविद्यालये शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तेसाठी यूजीसीकडे थेट अर्ज करू शकणार असून, स्वायत्ततेच्या नव्या नियमावलीवर 25 ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवता येतील. सुधारित नियमांमुळे महाविद्यालाये आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. स्वायत्त महाविद्यालयांवर देखरेख करण्यासाठी आयक्यूएसी सेल बनवण्यात येईल. त्याचा अहवाल वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.
Colleges in the country can decide their own courses
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजासाठी चंद्रकांत पाटलांची घोषणा : प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 15 लाखांपर्यंत व्याज परतावा
- नोटाबंदीच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : कार्यवाहीचे होणार थेट प्रक्षेपण; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर प्रकरण
- ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा : निवडणूक आयोगाकडे मागितली दाद, अंधेरीत उमेदवार देणार
- मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडिया जाएंट Meta रशियात दहशतवादी म्हणून घोषित