• Download App
    उत्तरेतील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा; राज्यात काही ठिकाणी पावसाचीही शक्यता cold in Maharashtra due to north winds; Chance of rain in some places in the state

    उत्तरेतील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा; राज्यात काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट आली आहे. शुक्रवारी मोठा गारठा वाढला होता. पण, २४ तासात तिचा प्रभाव ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.cold in Maharashtra due to north winds; Chance of rain in some places in the state

    पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले की, उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात येत आहेत. परंतु येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतात अँटीसायक्लोनची उपस्थिती असल्याने, महाराष्ट्रावरील वारे ईशान्येकडे, त्यानंतर पूर्वेकडून ईशान्येकडे आणि नंतर पूर्वेकडे वळतील.



    “२९ जानेवारीपासून, येत्या तीन ते चार दिवसांत रात्रीचे तापमान हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढेल,” डॉ कश्यप म्हणाले. सध्या, विदर्भात विशेषत: यवतमाळ, नागपूर, बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थंडीचा दिवस राहण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज असून या आठवड्यात म्हणजेच २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान, राज्यात दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा खूपच कमी असेल.

    cold in Maharashtra due to north winds; Chance of rain in some places in the state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!