प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकात सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे प्रत्येक पक्षाचे नेते झंझावाती प्रचार करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गडग जिल्ह्यात सभा होती. यादरम्यान येथे घडलेल्या एका प्रसंगाचे सर्वजण कौतुक करत आहेत.Cold drinks van looted by crowd for election rally, injured youth gets compensation of Rs 35,000
काय घडली घटना?
अमित शहा यांच्या निवडणूक सभेसाठी आलेल्या जमावाने सभास्थळाजवळ असलेली एक कोल्ड ड्रिंकची व्हॅन लुटली. यामुळे व्हॅनचालक समीर अब्बास या 22 वर्षीय तरुणाचे तब्बल 35 हजारांचे नुकसान झाले होते. लोकांनी कोल्डड्रिंकच्या सर्व बाटल्या रिकाम्या केल्याचे पाहून समीरला रडू आले होते. ही माहिती कळताच भाजपचे म्हैसूरचे तरुण खासदार प्रताप सिम्हा यांनी तत्काळ समीरची भेट घेऊन त्याच्या नुकसानी माहिती घेतली. त्यांनी समीरच्या बँक खात्यावर यूपीआयद्वारे 35 हजार रुपयेही पाठवले. या घटनेचे सर्वजण कौतुक करत आहेत.
अमित शहांचे मतदारांना आवाहन
गडग येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शहा म्हणाले होते की, प्रत्येक मत मोजले जाते, त्यामुळे ते योग्य नेतृत्वाकडे जाईल याची खात्री करा. तुमचे मत एक महान कर्नाटक निर्माण करेल, राज्याच्या विकासात, देशाच्या विकासात आपली सेवा देण्यासाठी मोदीजींना बळ देईल. कमळाच्या चिन्हाचे बटण दाबले की तुम्ही कोणाला तरी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदान करत नाही आहात, तर तुमचे एक मत देऊन तुम्ही महान कर्नाटक निर्माण करत आहात.
तुमचे एक मत कर्नाटकला पीएफआयपासून वाचवण्यासाठी आहे. तुमचे एक मत हे लाखो लोकांना मोफत धान्य देण्यासाठीचे मत आहे. तुमचे एक मत लाखो घरांना शौचालये, लाखो महिलांना गॅस सिलिंडर, पाच लाख ते लाखांपर्यंतच्या आरोग्य सुविधा आणि कर्नाटकात व्यवसाय आणण्यासाठी आहे.
Cold drinks van looted by crowd for election rally, injured youth gets compensation of Rs 35,000
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आणि ऊर्जा स्वयंपूर्णता; २०३५ पर्यंत सर्व प्रमुख बंदरांवर इंधन भरण्याच्या सुविधा
- 38 लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार, गडचिरोलीत झाली पोलिसांशी चकमक
- PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, म्हैसूरमध्ये रोड शोत महिलेने फुलांसह फेकला मोबाईल
- आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल ५८ वर्षांनंतर जिंकले सुवर्णपदक