• Download App
    कोईमतूर - शिर्डी धावली पहिली खासगी वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे!!; आकर्षण सुविधा, आरमदायक प्रवास!!Coimbatore - Shirdi run first private special train

    कोईमतूर – शिर्डी धावली पहिली खासगी वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे!!; आकर्षण सुविधा, आरामदायक प्रवास!!

    वृत्तसंस्था

    कोईमतूर : भारत गौरव या योजनेअंतर्गत मंगळवारी पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उद्घाटन झाले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूर ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे. एम अँड सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे ही पहिली खासगी रेल्वे “साउथ स्टार रेल” नोंदवली गेली आहे. Coimbatore – Shirdi run first private special train

    भारत गौरव योजना आहे काय?

    या योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्या रेल्वेकडून भाडेतत्वार गाड्या घेऊ शकणार आहेत.

    भारतीय रेल्वेकडून भाडेतत्वार घेतलेल्या या गाड्या कोणत्या मार्गावर चालवायच्या, भाडे किती आकारायचे आणि सेवा कोणच्या द्यायच्या इत्यादींचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात.

    खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेगाडी भाडेतत्वावर देताना प्रवाशांची लुबाडणूक होणार नाही, याची खात्री भारतीय रेल्वेने केलेली असते. भारतीय रेल्वेचीच ही योजना आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.



    – पहिली खासगी ट्रेन

    भारत गौरव योजनेंतर्गत कोईम्बतूर ते शिर्डी ही पहिली रेल्वेगाडी धावली.

    या गाडीला 20 डबे जोडले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय इत्यादी श्रेणींचे वातानुकूलित डबे. त्याबरोबरच स्लीपर कोचचे डबेही या गाडीला आहेत.

    ट्रेन कॅप्टनच्या हाती गाडीची सूत्रे असतील. तसेच, एक डाॅक्टर, खासगी सुरक्षा रक्षक हेही गाडीमध्ये तैनात असतील.

    प्रवाशांना शाकाहारी भोजन दिले जाईल. दर एक तासाने स्वच्छता कर्मचारी गाडी स्वच्छ करत जातील.

    या रेल्वेला सालेम, येलहन्का, धर्मावरम, मंत्रालयम, वाडी या स्टेशनवर गाडी थांबते मंत्रालयम मध्ये दर्शनासाठी पाच तासांचा अवधी भाविकांना दिला जाईल. तर शिर्डीमध्ये भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे पास दिले जातील.

    भाविकांसाठी वेगवेगळी तिकीट पॅकेजेस असून स्लीपर कोच पंचवीस थर्ड एसी 5000, सेकंड क्लास एसी 7000, फर्स्ट क्लास एसी 10000 असे भाडे असेल तर पॅकेजचे भाडे म्हणजे जाऊन येऊन प्रवासाचे भाडे 4999, 7999, 9999 आणि 12999 रुपये असेल

    दक्षिण रेल्वे ला यातून दरवर्षी तीन कोटी 34 लाख रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.

    Coimbatore – Shirdi run first private special train

    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली