• Download App
    नोकरी : कॉग्निझंटची दिलासादायक बातमी; यावर्षी करणार २८ हजार फ्रेशर्सची भरती।Cognizant to hire 28,000 Indian freshers this year

    नोकरी : कॉग्निझंटची दिलासादायक बातमी; यावर्षी करणार २८ हजार फ्रेशर्सची भरती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : २०२०-२१ या वर्षात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामध्ये आयटी क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे जॉबच्या शोधात असलेले फ्रेशर्सदेखील अडचणीत आले आहेत. आयटी क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी कॉग्निझंटने यावर्षी २८ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे. Cognizant to hire 28,000 Indian freshers this year

    गेल्या वर्षी २०२०मध्ये १७ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. यंदा यात १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. कॉग्निझंटच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ९६ हजार ५०० एवढी आहे. त्यापैकी दोन लाखाहून अधिक कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत.



    गेल्या काही महिन्यात कंपनीतील कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ही झीज आम्हाला भरून काढायची आहे. भारतात नोटीस पीरियड दोन महिन्यांचा होता. त्यामुळे यंदा भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे.

    कंपनी मल्टी-पार्ट योजना राबवित आहे. ज्यामध्ये करियरच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरचा आणखी विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे आणि महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक चांगली संधी आहे.

    Cognizant to hire 28,000 Indian freshers this year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही