वृत्तसंस्था
कोलकाता – कोरोनाची तिसरी लाट खरी आहे की नाही, यावर राजकीय वर्तुळात घमासान सुरू असताना कोरोनाचे कारण अनेक राजकीय नेत्यांना मात्र हातात चांगलेच सापडलेले दिसतेय.Coal Scam ED notice; Mamata Banerjee’s nephew absent from ED citing Corona’s cause; Following in the footsteps of Anil Deshmukh
१०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या वाढत्या वयाचे आणि कोरोना साथीचे कारण दाखवून सक्तवसूली संचलनालयासमोर ED हजर राहायला नकार दिला होता.
आता त्यांचाच कित्ता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या भाचेसुनेने गिरवला आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रूजिरा बॅनर्जी यांनी कोरोनाचे कारण दाखवून सक्तवसूली संचलनालयासमोर ED हजर राहायला नकार दिला आहे. त्यांना कोळसा घोटाळ्यात आज नवी दिल्लीतील ED कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
परंतु, आपली दोन मुले लहान आहेत. देशभर कोरोनाची साथ आहे. त्यामुळे आपण दिल्लीतील ED कार्यालयात येऊन हजर राहू शकत नाही. कोलकात्यातील घरी आपली चौकशी करायला हरकत नाही, असे पत्र रूजिरा बॅनर्जी यांनी ED ला लिहिले आहे. मात्र, त्या आज गैरहजर राहिल्याबद्दल आता ED त्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई करेल, हे पाहावे लागणार आहे.