• Download App
    दिल्लीत कोचिंग सेंटरला आग, घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी दोरीच्या सहाय्याने उड्या मारून वाचवला जीव Coaching center fire in Delhi scared students jump with rope to save lives

    दिल्लीत कोचिंग सेंटरला आग, घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी दोरीच्या सहाय्याने उड्या मारून वाचवला जीव

    अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील मुखर्जी नगर येथील कोचिंग सेंटरला आज आग लागली, त्यानंतर विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने उडी मारून जीव वाचवावा लागला. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आत्तापर्यंत कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. साधारण १२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे समोर आले आहे. Coaching center fire in Delhi scared students jump with rope to save lives

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिक मीटरमध्ये लागली, ती फार मोठी नव्हती, मात्र धूर वाढल्यानंतर मुले घाबरली आणि त्यांनी मागच्या रस्त्याने दोरीच्या साहाय्याने इमारतीवरून खाली उतरण्यास सुरुवात केली, त्यामुळे ४ विद्यार्थी जखमी झाले. प्रत्यक्षात दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याच्या प्रयत्नात अनेक विद्यार्थ्यांचा दोर हातून निसटल्याने ते जमिनीवर पडले.

    दिल्ली फायर सर्व्हिसेसचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, आम्हाला १२.२७ वाजता इमारतीला आग लागल्याचा फोन आला. नंतर कळले की हे कोचिंग सेंटर आहे आणि त्यात काही मुले अडकली आहेत. आम्ही एकूण ११ वाहने पाठवली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मीटरला आग लागली होती. काही मुले घाबरून खिडकीतून बाहेर आली, चार मुले किरकोळ जखमी आहेत.

    दिल्ली पोलीस पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितले की, आग इमारतीच्या मीटरमध्ये लागली. वरच्या मजल्यावर धुराचे लोट पसरल्याने गोंधळ उडाला. नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठीचे कोचिंग सेंटर होते, काही विद्यार्थी खिडकीतून खाली येण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये ३-४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

    Coaching center fire in Delhi scared students jump with rope to save lives

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते