विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटून आल्यानंतर दोनच दिवसांमध्ये दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या पीएने मारहाण केल्याची घटना घडली. दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासात स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवालांचा पीए विभव कुमार याने मारहाण केली. cm kejriwal aap swati maliwal accuses vibhav kumar assault calls
स्वतः स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री निवासातून पीसीआरला कॉल करून याविषयीची तक्रार केली. त्यानंतर पोलीस ताबडतोब मुख्यमंत्री निवासात दाखल झाले. परंतु तोपर्यंत स्वाती मालीवाल बाहेर पडल्या होत्या. त्यांनी तिथून सिविल लाईन्स पोलिसांमध्ये जाऊन लेखी तक्रार दाखल केली, असे मालीवाल यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पोलिसांनी मुख्यमंत्री निवास आपल्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली.
स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवालांच्या अटकेवर एक अवाक्षर देखील उच्चारले नव्हते. केजरीवालांच्या अटकेच्या वेळीच्या भारतात देखील नव्हत्या. त्या दीर्घकाळ परदेशात राहिल्या होत्या. दिल्लीत परतल्यानंतर त्या मुख्यमंत्री निवासस्थानात गेल्या, पण तिथे विभव कुमार यांनी अरविंद केजरीवालांच्या आदेशानुसारच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी पीसीआरला फोन करून केला.
दारू घोटाळ्यातून सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना केवळ 21 दिवसांचे जामीन दिले आहे या 21 दिवसांच्या कालावधीत केजरीवाल मुख्यमंत्री पदाच्या कोणत्याही कर्तव्याचे पालन करू शकणार नाहीत. ते फायलीवर सही करू शकणार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. या अटींवरच त्यांना जामीन दिला गेला. अशावेळी मुख्यमंत्री निवासात त्यांचा पीए विभव कुमार काय करत होता?? तिथे स्वाती मालीवाल का पोहोचल्या?? स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनुसार विभव कुमार यांनी त्याला का मारहाण केली??, असे एका पाठोपाठ एक गंभीर सवाल तयार झाले आहेत.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात ट्विट करून अरविंद केजरीवाल यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.
cm kejriwal aap swati maliwal accuses vibhav kumar assault calls
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!