• Download App
    CM Himanta Biswa Sarma Love Story Valentine Day Special

    Valentine Day Special : दिग्गज भाजप नेत्याची प्रेमकहाणी, भावी पत्नीला म्हणाले होते- एक दिवस मी CM होणार!

    विशेष प्रतिनिधी 

    आज व्हॅलेंटाइन डे आहे. या दिवशी जगभरातील तरुणाई आपले प्रेम व्यक्त करते. प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा ओलावा आयुष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जगात अनेक प्रेमकहाण्या प्रसिद्ध आहेत आणि त्या जोडप्यांच्या ओठांवरही आहेत. पण काही अशाही प्रेमकहाण्या असतात ज्या खूप कमी जणांना माहिती आहेत. अशीच एक प्रेमकहाणी आजच्या या खास दिवसानिमित्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. CM Himanta Biswa Sarma Love Story Valentine Day Special

    ही प्रेमकहाणी एका दिग्गज राजकारण्याची आहे. जे नेहमी आपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असतात. मोठमोठ्या मुद्द्यांवर आपले मत ते उघडपणे मांडतात. होय, तुम्हाला ते बरोबर समजले, येथे आम्ही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याबद्दल बोलत आहोत, जे अनेकदा त्यांच्या वाक्बाणांनी विरोधकांना पुरते घायाळ करतात. उल्लेखनीय आहे की काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणारे हिमंता सध्या आसाम राज्यातीलच नव्हे तर देशातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.

    2021 मध्ये जेव्हा त्यांनी आसामचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा शपथविधी समारंभात त्यांच्या पत्नी रिनिकी भुईया यांनी त्यांच्याबद्दल खूप रंजक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.



    पीटीआयशी बोलताना सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुईया यांनी त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते. दोघांची पहिली भेट कॉटन कॉलेजमध्ये झाली, जेव्हा सरमा 22 वर्षांचे आणि रिनिका 17 वर्षांच्या होत्या. दोघांची पहिल्या भेटीतच मैत्री झाली, जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली.

    रिनिकी भुईया यांनी सांगितले की, ‘एक दिवस मी हिमंताला सांगितले की, आता आपल्या कुटुंबीयांना आपल्या नात्याबद्दल माहिती द्यायला हवी.’ यावर हिमंता म्हणाला, ‘हो जरूर जा, तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांग.’ तेव्हा रिनिकी भुईयांनी त्यांना विचारले होते, ‘मी माझ्या आईला तुझ्या भविष्याबद्दल काय सांगू?’ त्यावर हिमंता म्हणाले होते, ‘त्यांना सांग मी आसामचा मुख्यमंत्री होणार आहे.’

    हिमंता बिस्वा सरमांची अप्रतिम प्रेमकथा

    रिनिकी म्हणाल्या, ‘तेव्हा मला माहिती नव्हते की एक दिवस ही गोष्ट नक्कीच खरी होईल. पण त्यांचे बोलणे ऐकून मला असे वाटले की ही व्यक्ती त्याच्या ध्येयांबद्दल आणि त्याच्या आयुष्याविषयी इतकी स्पष्ट आहे, जर मी त्याला माझा जीवनसाथी म्हणून निवडले तर मी कोणतीही चूक करणार नाही. अशी आहे हिमंता बिस्वा सरमा यांची प्रेमकहाणी…

    उद्योजक आहेत रिनिकी

    सौंदर्यवती असलेल्या रिनिकी या मीडिया हाऊस प्राइड ईस्ट एंटरटेनमेंटच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखले जाते. त्या उद्योगपती जाधव चंद्र भुईया यांच्या कन्या असून त्या राज्यशास्त्र आणि कायदा या विषयात पदवीधर आहेत. राजकीय वर्तुळातील हे हॉट जोडपे वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी असून या जोडप्याला दोन मुले (मुलगा नंदिल बिस्वा सरमा आणि मुलगी सुकन्या सरमा) आहेत.

    CM Himanta Biswa Sarma Love Story Valentine Day Special

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया