Ration Door Step Delivery Scheme : राजधानी दिल्लीत रेशनच्या डोर-टू-डोर वितरण योजनेसंदर्भात रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. आपला मुद्दा ठामपणे मांडत त्यांनी या प्रेसच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींना अभिवादन करत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. CM Arvind Kejriwal Holds Press Conference On Ration Door Step Delivery Scheme By Delhi Govt
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत रेशनच्या डोर-टू-डोर वितरण योजनेसंदर्भात रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. आपला मुद्दा ठामपणे मांडत त्यांनी या प्रेसच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींना अभिवादन करत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
केजरीवाल यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, आज मी खूप अस्वस्थ आहे. डोर-टू-डोर रेशन योजना येत्या आठवड्यापासून दिल्लीत सुरू होणार होती. म्हणजे आता लोकांना रांगेत उभे राहावे लागणार नव्हते. उलट सरकार चांगल्या पद्धतीने उत्तम धान्य पॅक करून त्यांच्या घरापर्यंत आणून देणार आहे.
सर्व तयारी पूर्ण झाली होती, पुढच्या आठवड्यातच हा क्रांतिकारी उपक्रम सुरू होणार होता आणि अचानक दोन दिवसांपूर्वी आपण हे थांबविले. सर का? ते म्हणाले की, आम्ही या योजनेसाठी केंद्र सरकारकडून एकदा नव्हे तर पाच वेळा परवानगी घेतली, परंतु असे असूनही ती सुरू होण्याच्या आठवड्यापूर्वीच ती नाकारण्यात आली.
कायदेशीरदृष्ट्या आम्हाला केंद्राच्या मंजुरीची आवश्यकता नाही, परंतु आम्ही सौजन्याने हे केले. या योजनेवर बंदी घालण्याचे कारण केजरीवाल यांनी केंद्र सरकारला वारंवार विचारले. ते म्हणाले की, जेव्हा हायकोर्टाने या योजनेवर स्थगिती दिली नाही, तर मग तुम्ही कसे देऊ शकता. जेव्हा या देशात पिझ्झा, बर्गर, स्मार्टफोन आणि कपड्यांची होम डिलीव्हरी करता येते, तर गरिबांच्या घरात रेशन का नाही?
केंद्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रेशन हे केंद्राचे आहे आणि ही योजना राबवून केजरीवाल सरकारला श्रेय लुटायचे आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मला या योजनेचे श्रेय अजिबात नको. मला ही योजना लागू करू द्या. हे राष्ट्रीय हिताचे आहे.
आत्तापर्यंत, मी राष्ट्रहिताच्या सर्व कामांमध्ये आपले समर्थन केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तुम्ही माझे समर्थन करा. आतापर्यंत सरकारने देशातील गरिबांना 75 वर्षांपासून रेशनच्या लांबच लांब रांगेत उभे केले. त्यांना आणखी 75 वर्षे रांगेत उभे राहू देऊ नका, अन्यथा ते आम्हाला कधीही क्षमा करणार नाहीत.
CM Arvind Kejriwal Holds Press Conference On Ration Door Step Delivery Scheme By Delhi Govt
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाषेवर भेदभाव थांबवा’, दिल्लीच्या रुग्णालयात परिचारिकांना मल्याळम बोलण्यावर बंदीच्या आदेशावर राहुल गांधींचा संताप
- HIV पॉझिटिव्ह महिलेला तब्बल 216 दिवस कोरोनाचा संसर्ग, शरीरात तयार झाले विषाणूचे खतरनाक 32 म्यूटेशन
- ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप
- बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट
- दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे