बिहारमध्ये खेला होणार हे अगोदरच जतीनराम मांझी यांनीही म्हटलं होतं.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि एके काळी नितीश कुमार यांच्या जवळचे म्हटले जाणारे सुशील मोदी म्हणाले – ‘राजकारणात दार नेहमीच बंद नसते, बंद असलेले दारही आवश्यकतेनुसार उघडता येते. सुशील मोदींचे हे विधान त्या चर्चांना बळ देणारे आहे ज्यात नितीश कुमार महाआघाडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.Closed doors can also be opened Sushil Modis big statement in political Happnigs in Bihar
दिल्लीतील अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांसमोर आलेले सुशील कुमार मोदी म्हणाले की, राजकारणात कोणताही दरवाजा कायमचा बंद नसतो. बंद असलेला दरवाजा गरजेनुसार उघडू शकतो. मात्र, आता हे दार उघडेल की नाही, माहीत नाही, असेही सुशील मोदी म्हणाले. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. काय होईल आणि काय होणार नाही याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.
बिहारमध्ये राजकीय गोंधळ
खरे तर गेल्या तीन-चार दिवसांपासून बिहारच्या राजकारणात सतत गोंधळ सुरू आहे. हा खेळ बिहारमध्ये खेला होणार, असे विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केलेले आहे. मांझी म्हणाले की, या महिन्यात नितीश कुमार पुन्हा एकदा बाजू बदलणार आहेत. बिहारमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू असताना मांझी यांचे वक्तव्य आले होते. भाजपने बिहारमधील बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावले, तेव्हा नितीशकुमारांनी पाटण्यात आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती.
Closed doors can also be opened Sushil Modis big statement in political Happnigs in Bihar
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा मोर्चा नवी-मुंबईत धडकला; आझाद मैदानावर उपोषणाची तयारी; पोलिसांनी परवानगी नाकारली
- ज्ञानवापीचा पुरात्त्वीय सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक, मंदिराचे तब्बल 32 पुरावे, महादेवाची 3 नावे, भंगलेल्या मूर्तीही सापडल्या
- आसाम मध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींकडून बॉडी डबलचा वापर??
- राष्ट्रपतींचे अभिभाषण : 75वे वर्ष अनेक अर्थाने ऐतिहासिक, राममंदिर, कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख