• Download App
    कोर्टाचे स्पष्ट आदेश, वजूवर बंदी!!; सीलबंद जागेच्या आणि अवशेषांच्या सुरक्षेचे अधिकार आणि जबाबदारी यांचे स्पष्ट वाटप!!Clear court order, ban on Vaju !!; Right to security of sealed space and relics

    ज्ञानवापीत शिवलिंग : कोर्टाचे स्पष्ट आदेश, वजूवर बंदी!!; सीलबंद जागेच्या आणि अवशेषांच्या सुरक्षेचे अधिकार आणि जबाबदारी यांचे स्पष्ट वाटप!!

    वृत्तसंस्था

    वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या या पार्श्वभूमीवर वाराणसी कोर्टाने काही स्पष्ट आदेश दिले आहेत. Clear court order, ban on Vaju !!; Right to security of sealed space and relics

    यामध्ये सर्वेक्षित जागा सील करण्याबरोबरच तेथील सुरक्षेचे अधिकार आणि जबाबदारी यांचे देखील स्पष्ट वाटप कोर्टाने केले आहे. येथून पुढे ज्ञानवापी मशीद परिसरात वजू वर बंदी घातली आहे. फक्त 20 मुस्लिमांना तेथे एका वेळी नमाज पठणाची परवानगी दिली आहे.

    हरिशंकर जैन यांच्या अर्जावर वाराणसी कोर्टाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी वर उल्लेख केलेले स्पष्ट निर्देश दिले आहेत.



    राखी सिंह आदी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार मूलवाद संख्या 693/2021 पर दिनांक 16 मे 2022 रोजीच्या सुनावणीत हरिशंकर तिवारी यांच्या अर्जानुसार ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग मिळाले आहे. या संपूर्ण वादातील ही सर्वात महत्त्वाची साक्ष आहे. त्यामुळे वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित सर्वेक्षक जागा ताबडतोब सील करण्याचे आदेश हे कोर्ट देत आहे. संबंधित जागेवर जाण्यापासून मुस्लिमांना रोखण्यात यावे. प्रवेश प्रतिबंधित करावा. मशिदीमध्ये फक्त 20 मुस्लिमांना नमाज पठण याची परवानगी द्यावी. मात्र त्यांना संबंधित सर्वेक्षित आणि संरक्षित जागेवर वजू करण्याची परवानगी नाही.

    वादी पक्षाने जी कागदपत्रे सादर केली आहेत. सर्वेक्षणात शिवलिंग मिळाल्याचे प्रमाण जे सादर केले आहे, त्यावर कोर्टाने विचार केल्यानंतर संबंधित दावा सध्यातरी स्वीकारावे स्वीकारणे कोर्टाला योग्य वाटते, असे निरीक्षण न्यायाधीश रवी दिवाकर यांनी नोंदविले आहे.

    ज्ञानवापी मशीद परिसरात जेथे शिवलिंग आढळले, त्या सर्वेक्षित जागेची सुरक्षितता आणि संरक्षण याची संपूर्ण जबाबदारी वाराणसीचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय आणि सीआरपीएफ कमांडेंट यांची व्यक्तिगत स्वरूपाची राहील, असे न्यायाधीश रवी दिवाकर यांनी लेखी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.

    ज्ञानवापी मशिद परिसरातील सर्वेक्षण केलेल्या जागेवर जे काही अवशेष मिळाले आहेत, त्याच्या सुपरव्हिजनची संपूर्ण जबाबदारी उत्तर प्रदेश पोलिस महानिदेशक आणि उत्तर प्रदेश शासनाचे मुख्य सचिव यांची राहील. या आदेशाच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब पाठविण्याचे आदेश ही न्यायाधीश रवी दिवाकर यांनी कोर्टाच्या स्टाफला दिले. हे आदेश संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे पोहोचल्याची माहिती 17 मे रोजीची नियमित सुनावणी सुरू होण्यापूर्वी कोर्टाला सादर करावी, असे आदेशही कोर्टाच्या स्टाफला आणि प्रशासनाला न्यायाधीशांनी दिले आहेत.

    एआयएमआयएमचा आदेश मानण्यास नकार

    एआयएमआयपक्षाचे नेते वारिस पठाण यांनी कनिष्ठ न्यायालयाचे आदेश मान्य करायला नकार दिला आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग मिळाल्याचा हिंदू पक्षाचा दावा मुस्लिम पक्षाने देखील फेटाळला आहे. याबाबत एआयएमआयएम तसेच अन्य मुस्लिम पक्ष अलाहाबाद हायकोर्टात जाणार आहेत. 1991 चा प्रार्थनास्थळ नियमन कायदा हा मुस्लिम पक्षाचा मुख्य आधार आहे.

    Clear court order, ban on Vaju !!; Right to security of sealed space and relics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!