विशेष प्रतिनिधी
हातकणंगले : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यात दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला. या मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले. सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बुथ मध्ये घुसले असल्याचा आरोप धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे काही काळ या मतदार केंद्रावरील मतदान बंद पडले होते. मात्र, त्यानंतर सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक वादावादी याचा हाणामारी देखील झाली, असल्याची माहिती समोर आली आहे.Clashes between workers of two candidates: Type in Hatkanangle Constituency; Activists of Mahayuti and MahaAghadi clashed
या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर काढले. त्यामुळे तणाव निवळला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मतदान प्रक्रिया दरम्यान होणारा मोठा अनर्थ टाळला आहे. वाळवा तालुक्यात साखराळे गावातील बुथ क्रमांक 62 आणि बुध क्रमांक 63 वर हा प्रकार घडला आहे. सदरील प्रकरणानंतर या केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.
हातकलंगलेत तिहेरी लढत
हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ आहे. अनेक वर्ष काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केले. बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने… माने घराण्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर नेहमीच वर्चस्व राखले आहे. तत्पूर्वी, 2009 ते 2019 पर्यंत या मतदारसंघाचे राजू शेट्टी यांनी नेतृत्व केले. हातकणंगलेत मविआकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.
Clashes between workers of two candidates: Type in Hatkanangle Constituency; Activists of Mahayuti and MahaAghadi clashed
महत्वाच्या बातम्या
- मायावतींची तडकाफडकी चाल; आकाश आनंदला उत्तराधिकारी आणि समन्वयक पदावरून हटविले!!
- गोविंद देवगिरीजी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार जाहीर
- मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूरकर फर्स्ट क्लास मध्ये टॉपवर; बारामतीकर सेकंड क्लास मध्ये शेवटून पहिले!!; नेमका अर्थ काय??
- पुतिन पाचव्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ; म्हणाले, ‘रशियाचे नेतृत्व करणे पवित्र कर्तव्य’