घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी शस्त्रे जप्त केली आहेत.दोन्ही दहशतवादी जैश या संघटनेशी संबंधित असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.Clashes between security forces and militants in Jammu and Kashmir; Two terrorists killed
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये शनिवारी (२५ डिसेंबर ) सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.दरम्यान या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी शस्त्रे जप्त केली आहेत.दोन्ही दहशतवादी जैश या संघटनेशी संबंधित असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सूत्रांनी सांगितले की या दहशतवाद्यांची नावे सज्जाद अहमद चेक (रा.ब्रेपोरा ) आणि राजा बासित नजीर (रा.पुलवामा ) अशी आहेत.दरम्यान अधिकाऱ्यांकडून अद्याप दहशतवाद्यांच्या नावांना दुजोरा मिळालेला नाही.
चाैगाममध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. पोलिसांनी आणि सेनेच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांनी जवानांवर गाेळीबार केला. सुरक्षादलाच्या जवानांनीही चाेख प्रत्युत्तर दिले. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
Clashes between security forces and militants in Jammu and Kashmir; Two terrorists killed
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये कोरोनाचे थैमान, एका दिवसात लाखांपेक्षा अधिक जणांना बाधा ; १३७ जणांचा झाला मृत्यू
- महिलेबरोबर अश्लिल चाळे करणारा वकिली व्यवसायातून केले निलंबित, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरू न्यायालयाचे कामकाज सुरु असताना प्रकार
- MALEGAON : मालेगावात पुन्हा एकदा पोतेभर धारदार तलवारी सापडल्याने खळबळ ; दोघे अटकेत
- सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करणार ; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शपथनाम्यातील वचनाला हरताळ