• Download App
    वंश - परिवारावादी नेते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत; मौन सोडत योगींचा टोला!! |Clan-family leaders cannot fight the battle for social justice; A group of yogis leaving silence

    वंश – परिवारावादी नेते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत; मौन सोडत योगींचा टोला!!

    प्रतिनिधी

    गोरखपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. अनेक मंत्री आणि आमदार भाजप सोडून समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत. गेले तीन दिवस भाजपमधून ही गळती सुरू असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र राजधानी नवी दिल्लीत भाजपच्या बैठकांमध्ये मग्न होते. आज प्रथमच उत्तर प्रदेशात गोरखपूर मध्ये येऊन योगी आदित्यनाथ यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना तोंडाला टोला लगावला आहे.Clan-family leaders cannot fight the battle for social justice; A group of yogis leaving silence

    वंशवाद आणि परिवार वादाचे राजकारण करणारे नेते सामाजिक न्यायाची खरी लढाई लढू शकत नाहीत, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी स्वामी प्रसाद मौर्य तसेच अन्य मंत्र्यांचा आमदारांचा समाचार घेतला आहे.



    या सर्व नेत्यांनी भाजपा सोडताना पक्षावर ओबीसी दलित आणि पिछडावर्ग यांच्या विरोधात काम करण्याचा आरोप केला आहे. त्यावर योगी आदित्यनाथ यांनी आज सविस्तर उत्तर दिले आहे. गोरखपूर मध्ये समता खिचडी कार्यक्रमात योगी सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना योगी म्हणाले, की वंशवाद आणि परिवार वादाचे राजकारण करणारे नेते कधीच सामाजिक न्यायाची खरी लढाई लढू शकत नाहीत.

    ज्यांच्या डीएनए मध्ये भ्रष्टाचार आहे ते आज सामाजिक न्यायाच्या फक्त गप्पा मारत आहेत. पण त्यांचे गुंड माफिया दलित वस्ती, ओबीसी वस्ती मध्ये जाऊन गरिबांची घरे लुटत होते. जमिनीवर कब्जा करत होते. गरिबांच्या घरांवर बुलडोझर चालवत होते तेव्हा सामाजिक न्यायाच्या गप्पा मारणारे हे नेते गप्प बसले होते. समाजवादी पक्षाच्या राजवटीत ही गुंड आणि माफियागिरी सुरू होती.

    सामाजिक न्याय म्हणजे गरिबांना भेदभावरहित सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, सर्व सरकारच्या सर्व सवलती त्यांना उपलब्ध करून देणे हा आहे. भाजपचा राजवटीत 47 लाख गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली. समाजवादी राजवटीत फक्त 18 हजार घरे बनवण्यात आली होती. ती देखील समाजवादी पक्षाच्या गुंड माफियांनी कब्जात घेतली होती. महिलांसाठी शौचालये बनवण्याचे काम भाजपने केले आहे.

    समाजवादी पक्षाने फक्त गुंड माफियागिरी केली आणि आजही फक्त वंशवाद आणि परिवार वादाचे ते राजकारण करत आहेत. ज्यांच्या डीएनएमध्ये भ्रष्टाचार वंशवाद आणि परिवार वादाचे राजकारण आहे ते नेते सोडून गेले आहेत, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

    भाजपला गळती लागल्यानंतर योगी आदित्यनाथ हे गेले तीन दिवस मौन बाळगून होते. ते राजधानी दिल्लीत पक्षाच्या नेतृत्वा बरोबरच्या बैठकीत तिकीटे फायनल करत होते. आज त्यांनी प्रथमच पक्ष सोडून जाणार यांविषयी राजकीय टिप्पणी केली आहे.

    Clan-family leaders cannot fight the battle for social justice; A group of yogis leaving silence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले