• Download App
    सरन्यायाधीश रमणांचे खडेबोल : सीबीआयने लोकांचा विश्वास गमावला, राजकारण्यांशी असलेले लागेबांधे तोडा, तरच विश्वासार्हता येईल|"CJI tells police to reclaim social legitimacy, trust by breaking nexus with political executive

    सरन्यायाधीश रमणांचे खडेबोल : सीबीआयने लोकांचा विश्वास गमावला, राजकारण्यांशी असलेले लागेबांधे तोडा, तरच विश्वासार्हता येईल

    भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच CJI रमणा यांनी म्हटले आहे की CBI ने आपली विश्वासार्हता गमावली आहे. सीबीआयने जनतेचा विश्वास परत मिळवण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती रमणा यांनी शुक्रवारी सांगितले की, “जर तुम्हाला विश्वासार्हता परत मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला राजकारण्यांशी संबंध तोडावे लागतील आणि विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी पुन्हा काम करावे लागेल.”CJI tells police to reclaim social legitimacy, trust by breaking nexus with political executive


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच CJI रमणा यांनी म्हटले आहे की CBI ने आपली विश्वासार्हता गमावली आहे. सीबीआयने जनतेचा विश्वास परत मिळवण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती रमणा यांनी शुक्रवारी सांगितले की, “जर तुम्हाला विश्वासार्हता परत मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला राजकारण्यांशी संबंध तोडावे लागतील आणि विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी पुन्हा काम करावे लागेल.”



    वृत्तसंस्थेनुसार, ‘लोकशाहीतील तपास यंत्रणेची भूमिका आणि जबाबदारी’ या विषयावरील व्याख्यानादरम्यान सरन्यायाधीश म्हणाले, ‘राजकीय अधिकारी काळासोबत बदलतील, पण तुम्ही (सीबीआय) कायम आहात.’ सरन्यायाधीशांनी भारतातील पोलीस यंत्रणेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, पोलिसांची कार्यशैली आजही ब्रिटीशकालीन आहे. ती बदलण्याची गरज आहे.

    देशातील एक स्वायत्त तपास संस्था उभारावी

    सीबीआयसह सर्व तपास यंत्रणांना एका छताखाली आणण्याची गरज असून त्यासाठी स्वायत्त तपास यंत्रणा बनवायला हवी, असे सरन्यायाधीश म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अशी जबाबदारी स्वतंत्र व्यक्तीकडे द्यावी.

    आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित अधिकाऱ्यांची कमतरता

    सरन्यायाधीश म्हणाले की, केंद्रीय एजन्सीकडे कामाचा भार जास्त असला तरी त्यांच्याकडे संसाधनांची तीव्र कमतरता आहे. ते म्हणाले की, सीबीआयकडे आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित अधिकारी यासह अनेक मूलभूत पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे अनेकवेळा खटला सोडवणे अवघड होऊन बसते.

    CJI tells police to reclaim social legitimacy, trust by breaking nexus with political executive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : सर्व महत्त्वाच्या खात्यांच्या सचिवांची पंतप्रधानांसमवेत बैठक; सुरक्षा आणि समन्वयाच्या केल्या महत्वपूर्ण सूचना!!

    Lahore Pakistan : पाकिस्तानातील लाहोरमध्ये एकामागून एक तीन स्फोट, आपत्कालीन सायरन वाजला

    अमृतसर एअर बेसवर हल्ला केल्याचा पाकिस्तानी हॅन्डलर्स कडून फेक व्हिडिओ व्हायरल; भारतीय संरक्षण मंत्रालयाचा स्पष्ट खुलासा!!