विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आज आपण चांगल्या आठवणी आणि सदिच्छांसह निवृत्त होत आहे, असे मत मावळते सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज मांडले. सरन्यायाधीश बोबडे यांनी आपल्या कार्यकाळात ऐतिहासिक अयोध्या खटल्यासह अनेक मुद्दे निकाली काढले. CJI Sharad Bobade retired from service
कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी कोविडच्या स्थितीवरील खटल्यावर त्यांनी सुनावणी केली. ते म्हणाले की, या शेवटच्या सुनावणीचा अनुभव संमिश्र आहे. आपण आनंदाने, सदिच्छाने आणि चांगल्या आठवणीने निवृत्त होत आहोत. न्यायालयातील एकाहून एक सरस युक्तिवाद, वकिलांचे उत्तम सादरीकरण, चांगले वर्तन याच्या आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत.
२४ एप्रिल १९५६ रोजी नागपूर येथे जन्मलेले सरन्यायाधीश बोबडे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स आणि कायद्याची पदवी नागपूर विद्यापीठातून घेतली. १९७८ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र येथे त्यांचे नाव नोंदले गेले.
न्यायाधीश बोबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली. १९९८ रोजी त्यांना ज्येष्ठ वकिलाचा दर्जा दिला. २९ मार्च २००० रोजी त्यांना पदोन्नती मिळाली आणि ते सह न्यायाधीश बनले. १६ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. १२ एप्रिल २०१३ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
CJI Sharad Bobade retired from service
महत्वाच्या’ बातम्या
- लसी चोरल्याचे लक्षात आल्यावर त्याच्यातील मानवता झाली जागी
- महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची माहिती
- बँकेत काम आहे तर आपल्याला वेळांबाबत हे माहित आहे का?
- हे आहे अमेरिकन ड्रिम, खिशात आठ डॉलर्स घेऊन गेलेल्या भारतीयाची मुलगी बनली असोसिएट अॅटर्नी जनरल
- चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीवर इंजक्शनचा साठा विकून टाकला!
- ऑस्ट्रेलियाचा कुरापतखोर चीनला दणका, दोन करार केले रद्द
- आता तरी राजकारण बंद करून दोषारोप बंद करा, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
- लस एकच, मात्र कंपनीकडून त्याची विक्री तीन वेगवेगळ्या दराने कशासाठी ?