- पौर्णिमा गायकवाड नेमकी कशी साकारली, अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केला अनुभव.
पुणे : डिस्नी + हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या ”द सिटी ऑफ ड्रीम “या लोकप्रिय वेब सिरीजचा तिसरा सीजन 26 मे रोजी रिलीज होतोय. या आधीचे दोन्हीही सीजन प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते.. महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असलेली ही सिरीज आणि मुंबई शहरा भोवती फिरणार ते राजकारण. प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीसं उतरलं होतं.City of Dream web series third season is releasing soon
अभिनेता अतुल कुलकर्णी, अभिनेत्री प्रिया बापट अभिनेते सचिन पिळगावकर, यासारखे दिग्गज या वेब सिरीजमध्ये काम करतायेत. सिटी ऑफ ड्रीम या सिरीज मधली प्रिया बापटीची “पौर्णिमा गायकवाड ही राजकारणी स्त्रीची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. राजकारण आणि राजकारणामधली महत्त्वकांक्षा हा धागा पकडून ही सिरीज पुढे जाते.
पौर्णिमे गायकवाड या भूमिकेबद्दल प्रिया सांगते, पौर्णिमा आणि प्रिया या दोघींच्या स्वभावामध्ये बरीच तफावत आहे. माझा मूळ स्वभाव असा हा नाही. प्रत्येक गोष्टीवर तिची व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी आत्मसात करायला थोडा वेळ लागला.
परंतु जेव्हा तुमच्याकडे उत्तम लिखाण आणि चांगला दिग्दर्शक असतो. तेव्हा तुम्ही तुमची भूमिका योग्य प्रकारे लोकांसमोर घेऊन जाऊ शकता. या भूमिकेने मला अनेक गोष्टी शिकवल्या. त्या सगळ्या गोष्टी अभिनेत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून कायम माझ्या जवळ राहतील.
दरम्यान सिटी ऑफ ड्रीमचा पहिला सीजन 2019 मध्ये दुसरा सीजन 2021 मध्ये तर तिसरा सीजन येत्या 26 मे रोजी प्रसारित होणार आहे.
City of Dream web series third season is releasing soon
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू
- सिद्धरामय्या की शिवकुमार??; गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा; मल्लिकार्जुन खर्गे पेचात!!
- अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
- आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25000 रुपये; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय