कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार केली आहे.Citizens of Lucknow complain against Adar Poonawal, Antibodies are not produced in the body even after taking Kovishield
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑ फ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार केली आहे.
लखनऊमधील प्रताप चंद्रा यांनी आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की मी ८ एप्रिलला लसीचा पहिला डोस घेतला होता. २८ दिवसांनी त्यांचा दुसरा डोस होता.
मात्र, त्याच दिवशी त्यांना लसीच्या दुसऱ्या डोससाठीची मुदत सहा आठवड्यांनी वाढविल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर बारा आठवडे केले.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मला बरे वाटत नव्हते असे सांगताना चंद्रा म्हणाले, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले होते की कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यावर शरीरात चांगल्या अॅँटीबॉडी तयार होतात.
मी सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत कोव्हिड अॅँटीबॉडी टेस्ट करून घेतली. या टेस्टमध्ये कोरोनाविरोधात अॅँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले नाही. उलट माझ्या शरीरातील प्लेटलेटस काऊंट तीन लाखांवरून दीड लाखांवर गेला.
प्लेटलेटस निम्याने कमी झाल्याने कोरोना होण्याचा धोका जास्त वाढला आहे.चंद्रा यांची तक्रार पोलीसांनी नोंदवून घेतली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.
चंद्रा यांनी डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्टीय आरोग्य मिशनच्या संचालक अपर्णा उपाध्याय यांची नावेही तक्रारीत दिली आहे.
हे प्रकरण संवेदनशिल असल्याने वरिष्ठांशी चर्चा करूनच गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले आहे. मात्र, गुन्हा दाखल केला नाही तर आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे.
Citizens of Lucknow complain against Adar Poonawal, Antibodies are not produced in the body even after taking Kovishield
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे झाले नामकरण, डेल्टा आणि काप्पा नावाने ओळखला जाणार व्हायरस
- निर्बंधाविना पंढरपूरची निवडणूक मग निर्बंधासह वारी का नाही? वारकऱ्यांचा सवाल, न्यायालयात जाण्याचा इशारा
- सुरक्षित गुंतवणुकीचा फंडा ओळखा
- संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेचा गजर, १०८ प्रकारच्या लष्करी साहित्याच्या आयातीवर केंद्राची बंदी
- प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना निवारा आणि १ कोटी २० लाख लोकांना रोजगार