• Download App
    मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय "नागरिकांचा" विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!"|Citizens" are being opposed to the Modi government's Advanced Bharat Sankalp Ratha; But this is the hidden pattern of NCP!!

    मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय “नागरिकांचा” विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रातल्या मोदी सरकारने लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोदी सरकार प्रगत भारत संकल्प तयार करून तो गावागावात पोहोचवत आहे. पण गावातले काही नागरिक या रथावरच्या “मोदी सरकार” या नावाला आक्षेप घेत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून तयार करण्यात येत आहे.“Citizens” are being opposed to the Modi government’s Advanced Bharat Sankalp Ratha; But this is the hidden pattern of NCP!!



    विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये काही गावांमध्ये या रथावरच्या “मोदी सरकार” या नावाला आक्षेप घेऊन नागरिकांनी हे रथ परत पाठवल्याच्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये झळकल्या. मोदी सरकार म्हणू नका, भारत सरकार म्हणा. केंद्र सरकारने दिलेल्या योजना हा नागरिकांचा संविधानाने दिलेला हक्क आहे. मोदी सरकारने केलेले उपकार नाहीत, अशी भाषा हे विरोध करणारे नागरिक वापरत आहेत. वास्तविक सरकारच्या रथावर कुठल्याही नेत्याचा वैयक्तिक प्रचार सुरू नाही.

    परंतु तरीही रथाला विरोध होतो आहे. या मागचा एक विशिष्ट पॅटर्न या निमित्ताने पुढे आला आहे, तो म्हणजे जे “नागरिक” बनून रथावरच्या मोदी सरकार या नावाला आक्षेप घेत असल्याचे दाखविले जात आहे, ते प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिक नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे नंतर उघड झाले आहे. पण मोदी सरकारच्या योजनांना थेट विरोध करता येत नाही, त्या योजनांच्या लाभार्थ्यांना अडवता येत नाही हे पाहून आपल्या पक्षाचा झेंडा आणि नाव गुंडाळून हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वसामान्य “नागरिक” म्हणून पुढे येऊन मोदी सरकारच्या योजनांना आणि मोदी सरकारच्या नावाला ग्रामीण भागात कसा विरोध होतो आहे हे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत.

    पण खरे तर यात उलट शरदनिष्ठ राष्ट्रवादीचीच खरी गोची होत आहे. कारण त्यांना ना स्वतःचा झेंडा हातात घेता येतो आहे, ना स्वतःच्या पक्षाचे नाव निश्चितपणे सांगता येत आहे. कारण पक्षाचे सगळे झेंगट निवडणूक आयोगात आणि सुप्रीम कोर्टात अडकले आहे. मोदी सरकारला ग्रामीण भागातील “नागरिक” विरोध करतात हे दाखवण्याचा त्यांचा आटापिटा मात्र सुरू आहे.

    “Citizens” are being opposed to the Modi government’s Advanced Bharat Sankalp Ratha; But this is the hidden pattern of NCP!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी