• Download App
    पाचशे कोटी रुपयांचे आठ फूट उंचीच पाचू रत्नाचे शिवलिंग बँकेच्या लॉकरमधून तामिळनाडूत जप्त|Eight-foot-tall Pachu Ratna worth Rs 500 crore seized from Shivling locker in Tamil Nadu

    पाचशे कोटीचे शिवलिंग बँकेच्या लॉकरमधून जप्त; तमिळनाडूमधील तंजावरमध्ये कारवाई

    वृत्तसंस्था

     त्रिची: तमिळनाडूतील तंजावरमधील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून ५०० कोटी रुपयांचे पाचूचे शिवलिंग जप्त केले आहे. CID police recovered an emerald lingam claimed to be worth Rs 500 crore from the bank locker of a man in Thanjavur

    सीआयडी विंगचे प्रमुख के जयंत मुरली यांनी शुक्रवारी चेन्नई येथे पत्रकारांना सांगितले की, त्यांना तंजावरमधील एका घरात पुरातन मूर्ती ठेवल्याची कुणकुण लागली. त्यानुसार ही कारवाई केली.

    अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. राजाराम यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे पथक आणि पी. अशोक नटराजन यांनी गुरुवारी तंजावरमधील अरुलानंद नगर येथील एका घराची झडती घेतली. त्यांनी एन. ए. समियप्पन यांचा मुलगा एन. एस. अरुण याची चौकशी केली. अरुणने पोलिसांना सांगितले की, त्याच्या वडिलांनी तंजावरमधील एका बँक लॉकरमध्ये पाचूचे पुरातन शिवलिंग ठेवले आहे. त्यानंतर ते तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले.

    शिवलिंगाचे वजन ५३० ग्रॅम आणि त्याची उंची ८ सेमी होती. समियप्पन यांना ते कसे मिळाले ? याबाबत अनभिज्ञ असल्याचा दावा त्यांचे पुत्र अरुण यांनी केला.



    दरम्यान, रत्नशास्त्रज्ञांनी या शिवलिंगाची किंमत ५०० कोटी रुपये केली आहे.

    दरम्यान, नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुकुवलाई येथील शिवमंदिरातून २०१६ मध्ये एक गायब झालेले हे शिवलिंग होते का ? याचा पोलिस तपास करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समियप्पन तपासात सहकार्य करत आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे.

    CID police recovered an emerald lingam claimed to be worth Rs 500 crore from the bank locker of a man in Thanjavur

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य