• Download App
    केरळमध्ये ख्रिस्ती समुदायाची संख्या वाढवण्यासाठी चर्चने सुरु केल्या अनेक योजना, कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य |Church will gave economic support for Christian families

    केरळमध्ये ख्रिस्ती समुदायाची संख्या वाढवण्यासाठी चर्चने सुरु केल्या अनेक योजना, कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य

    विशेष प्रतिनिधी

    कोची – मध्य केरळच्या एका कॅथॉलिक चर्चने केरळमधील मोठ्या ख्रिस्ती कुटुंबीयांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या कुटुंबांना अर्थसाह्य करण्यासाठी आणि राज्यात ख्रिस्ती समुदायाची संख्या वाढवण्यासाठी योजना आणली आहे.Church will gave economic support for Christian families

    मध्य केरळमधील सिरो मलबार चर्चने म्हटले की, वर्ष २००० नंतर ज्यांचा विवाह झाला आहे आणि त्यांना पाच किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतील तर त्या जोडप्यांना दरमहा दीड हजार रुपये अर्थसाह्य केले जाणार आहे.



    चौथ्यांदा गरोदर असलेल्या महिलांना चर्चच्या रुग्णालयाकडून मोफत बाळंतपणाची सुविधा दिली जाणार आहे. त्याचवेळी चौथ्या किंवा कुटुंबात आणखी जन्मणाऱ्या बाळाला चर्चच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

    हा निर्णय घेणारे प्रमुख जोसेफ कुट्टियनकल यांनी म्हटले, या योजनेतंर्गत राज्यातील समुदायातील कुटुंबाकडून अर्ज मिळत असून त्यांना ऑगस्टपासून मदत देणे शक्य आहे. कोरोनानंतरच्या स्थितीत दोन्ही आघाड्यांवर अडचणीत आलेल्या कुटुंबाला किमान अर्थसाह्य व्हावे यादृष्टीने योजना राबवली जात आहे.

    केरळमध्ये ख्रिस्ती समुदायाची संख्या गेल्या काही वर्षांपासून कमी होत असून ही योजना राबविण्याचे हेच प्रमुख कारण आहे. ख्रिस्ती समुदायाचा विकास दर कमी आहे. कोरोना काळानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा मुकाबला करणाऱ्या मोठ्या ख्रिस्ती कुटुंबीयांना अर्थसाह्य केले जाणार आहे.

    ते म्हणाले की, ख्रिस्ती समुदाय हा राज्यातील सर्वात मोठा दुसरा समुदाय होता. परंतु आता हा समुदाय राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १८.३८ टक्के राहिला आहे. अलीकडच्या काळात खिस्ती समुदायाचा जन्मदर १४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

    Church will gave economic support for Christian families

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!