• Download App
    तिरुपती बोर्डाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन व्यक्ती, टीडीपीचा सवाल- हिंदू धर्म न मानणाऱ्याला जबाबदारी का?|Christian person as chairman of Tirupati Board, TDP's question - Why responsibility for non-Hindu?

    तिरुपती बोर्डाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन व्यक्ती, टीडीपीचा सवाल- हिंदू धर्म न मानणाऱ्याला जबाबदारी का?

    वृत्तसंस्था

    तिरुपती : आमदार करुणाकर रेड्डी यांना देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपतीच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण म्हणजे करुणाकर रेड्डी यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते. आंध्र सरकारच्या या निर्णयावर तेलगू देसम पार्टी (टीडीपी), भाजप आणि अनेक विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Christian person as chairman of Tirupati Board, TDP’s question – Why responsibility for non-Hindu?

    टीडीपीचे राज्य सचिव बुची राम प्रसाद यांनी हिंदू धर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष कसा बनवता येईल, असा सवाल केला. प्रत्येकाला माहिती आहे की ते ख्रिश्चन धर्म मानतात. त्यांचे ख्रिश्चन लोकांशी संबंध आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाले होते, असेही ते म्हणाले.



    भाजपने म्हटले–पदाचा राजकीय वापर दुर्दैवी

    भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांनीही या पदावर हिंदू धर्म मानणाऱ्यांनीच बसावे, असे म्हटले आहे. सरकार या पदाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे शासनाच्या निर्णयावरून सिद्ध होते, असे त्यांनी म्हटले.

    भाजप नेते आणि माजी मुख्य सचिव आय वाय आर कृष्ण राव हे तिरुपती बोर्डाचे कार्यकारी अधिकारी होते, त्यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, टीटीडी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची राजकीय नियुक्ती होणे दुर्दैवी आहे.

    सरकारने म्हटले, निर्णय योग्य

    YSRCP ने निर्णय योग्य ठरवला आहे. पक्षाचे आमदार श्रीकांत रेड्डी म्हणाले की, करुणाकर रेड्डी यांच्या धार्मिक श्रद्धांबाबत कोणताही वाद नाही. विरोधी पक्ष विनाकारण मुद्दे काढत आहेत. तिरुपतीच्या लोकांना करुणाकर रेड्डी आणि त्यांच्या धर्माबद्दल सर्व काही माहिती आहे, असे ते म्हणाले.

    दुसऱ्यांदा होणार ट्रस्टचे अध्यक्ष

    करुणाकर रेड्डी 10 ऑगस्ट रोजी तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांना हे पद सोपवण्याची ही दुसरी वेळ आहे. जगन मोहन रेड्डी यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना करुणाकर रेड्डी यांना 2006-2008 दरम्यान ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.

    करुणाकर रेड्डी हे वायएसआर कुटुंबाचे कट्टर समर्थक आहेत. यापूर्वी ते जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसमध्येही होते. वडिलांच्या मृत्यूनंतर जगन मोहन यांनी वायएसआर काँग्रेसची स्थापना करण्यासाठी काँग्रेस सोडली तेव्हा करुणाकर त्यांच्याबरोबर गेले. करुणाकर म्हणतात की, त्यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते, परंतु ते हिंदू धर्माचे पालन करतात.

    Christian person as chairman of Tirupati Board, TDP’s question – Why responsibility for non-Hindu?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य