• Download App
    खिस्ती धर्मगुरूने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीने बनविला व्हिडीओ|Christian clergyman rapes minor girl, wife makes video

    खिस्ती धर्मगुरूने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीने बनविला व्हिडीओ

    विशेष प्रतिनिधी

    गुजरात : तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यातील एका ख्रिस्ती धर्मगुरूला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेचे चित्रीकरण करून त्याचा वापर करून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे.Christian rapes minor girl, wife makes video

    मे महिन्यात हा प्रकार घडला होता. मंगळवारी सोनगड पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली.त्यानंतर ख्रिस्ती बळीराम कोकणी आणि त्यांची पत्नी अनिता यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.



    या दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी शेतमजूर म्हणून काम करत होती आणि प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेली होती. त्यानंतर आरोपीने तिचे आणि तिच्या पालकांशी संपर्क वाढवला.

    कोकणी आणि त्याच्या पत्नीने तिला केवायसी करून देण्याच्या बहाण्याने तिला सोनगड येथे बोलावले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. मे महिन्यात तिच्या शेतातील झोपडीत पहिल्यांदा बलात्कार झाला होता. दुसºया दिवशीही कोकणीने पैसे बँकेत जमा करू असे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

    दोन्ही वेळी कोकणीची पत्नी अनिता हजर होती. 31 मे 2021 रोजी या जोडप्याने तिची केवायसी करून देण्याच्या बहाण्याने तिला पुन्हा सोनगड येथे बोलावले आणि तिसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. कोकणीची पत्नी अनिता हिने फोनवर हा घृणास्पद गुन्ह्याचे चित्रीकरण केले.

    क्लिप दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने तिच्या तक्रारीत केला आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने अल्पवयीन मुलीने यापूर्वी तक्रार केली नसल्याचा पोलिसांना संशय आहे.

    Christian clergyman rapes minor girl, wife makes video

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!