• Download App
    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा चित्ररथ प्रथमच कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सामील Chitrarath of Narcotics Control Bureau participates in Republic Day celebrations on duty for the first time

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा चित्ररथ प्रथमच कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सामील

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या ड्रग्स तस्करीला केंद्रातील मोदी सरकारने जबरदस्त ब्रेक लावल्याच्या पार्श्वभूमीवर आज 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर प्रथमच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा चित्ररथ संचलनात सामील झाला होता. नशा मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ होता. Chitrarath of Narcotics Control Bureau participates in Republic Day celebrations on duty for the first time

    केंद्र सरकारने ड्रग्स तस्करी विरोधात मोहीम राबविण्याबरोबरच नशा मुक्त भारताची संकल्पना देखील आघाडीवर येऊन राबवली आहे. देशभरातल्या सीमावर्ती राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्स तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करून हजारो किलो ड्रग्स पकडून नष्ट करण्यात आले आहे.

    या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा चित्ररथ त्यामुळेच कर्तव्यपथावर संचलनात समाविष्ट करण्यात आला होता.

    महाराष्ट्राचा साडेतीन शक्तीपीठाचा चित्ररथ

    कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा साडेतीन शक्तीपीठाचा चित्ररथ देखील समाविष्ट झाला होता. या चित्ररथाद्वारे चित्ररथाद्वारे महाराष्ट्राची जागरण गोंधळाची परंपरा देखील या निमित्ताने विशेष पाहुण्यांना दाखविण्यात आली. पश्चिम बंगालने दुर्गा पूजेचा चित्ररथ संचलनासाठी पाठवला होता, तर आसाम सरकारने कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती चित्ररथाद्वारे सादर केली होती.

    Chitrarath of Narcotics Control Bureau participates in Republic Day celebrations on duty for the first time

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!