विशेष प्रतिनिधी
पाटणा : लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनीआपले काका पशुपती पारस यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.Chirag Paswan warns to go to court if uncle is given ministerial post
त्यांना मंत्रीमंडळात घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा चिराग यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मंत्रीमंडळात घेणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
चिराग यांनी पाटण्यात पत्रकार परिषद घेऊन लोक जनशक्ती पाटीर्तून हकालपट्टी केलेले खासदार पशुपती पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी केली आहे. पशुपती पारस राम विलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका आहेत.
चिराग पासवान म्हणाले की, लोजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे. माझ्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून कोणालाही मंत्रीपद देणे योग्य नाही. रामविलास पासवान यांच्या विचारांना पायदळी तुडवत वेगळा गट स्थापन केलेल्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
निवडणूक आयोगालाही याची माहिती देण्यात आली आहे. पण, असे झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वात आधी जनता दल यूनायटेडमध्ये फुट पडेल असे सांगून चिराग पासवान म्हणाले, नितीश कुमारांचे सरकार दीड-दोन वर्षांपेक्षा जास्त चालणार नाही.
खासदार पशुपती पारस यांना मंत्रीमंडळात घ्यायचे असेल तर जेडीयूमध्ये सामील करुन घ्या आणि मंत्रीमंडळात स्थान द्या.लोकजनशक्ती पक्षामध्ये मोठी फूट पडली असून पक्षाच्या सर्वच्या सर्व पाच खासदारांनी पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला आहे. या गटाने चिराग पासवान यांचे नेतृत्व झुगारून दिले आहे.
Chirag Paswan warns to go to court if uncle is given ministerial post
महत्त्वाच्या बातम्या
- विमा कंपन्यांशी सरकारचे साटेलोटे, सात वर्षांची आकडेवारी देत देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
- पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात
- लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती
- गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान
- Monsoon Session 2021 : पावसाळी अधिवेशनात काय कामकाज झाले? कोणती विधेयके – कोणते ठराव पास झाले? वाचा सविस्तर..