• Download App
    चिनी मोबाईल कंपन्यांच्या प्राप्तिकर खात्याच्या रडारवर, करचुकवेगिरीच्या संशयाने छापे|Chinese mobile companies on the radar of the income tax department , raids on suspicion of tax evasion

    चिनी मोबाईल कंपन्यांच्या प्राप्तिकर खात्याच्या रडारवर, करचुकवेगिरीच्या संशयाने छापे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चार ते पाच चिनी मोबाईल कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याचा संशय असल्याने त्यांच्या भारतातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने (आयटी) छापे टाकले. त्यामध्ये या कंपन्यांच्या मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद येथील कार्यालयांचा समावेश आहे.Chinese mobile companies on the radar of the income tax department , raids on suspicion of tax evasion

    या कंपन्यांचे वितरक व विक्रेते यांच्याही व्यवहारांची प्राप्तिकर खाते तपासणी करणार आहे. ओप्पो या चिनी मोबाईल कंपनीने सांगितले की, प्राप्तिकर खात्याच्या चौकशीला आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करत आहोत. भारतात तेथील कायद्यांनुसार आमच्या कंपनीचे व्यवहार होत आहेत.



    शाओमी कंपनीने सांगितले की, आम्ही भारतीय कायद्यांचे व्यवस्थित पालन करत आहोत.चिनी कंपन्यांच्या भारतातील कार्यालयांवर कोणत्या कारणांमुळे धाडी टाकण्यात आल्या हे प्राप्तिकर खात्याने स्पष्ट केलेले नाही.

    तसेच या कार्यालयांतून कोणती कागदपत्रे व वस्तू जप्त केल्या याबद्दलही या खात्याने माहिती दिलेली नाही. चिनी कंपन्यांकडून भारतात होणाºया व्यवहारांवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे.दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये चिनी मोबाईल कंपन्यांशी संबंधित संस्थांवर छापे टाकण्यात आले आहेत.

    त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. शाओमी, वनप्लस आणि ओप्पोसाठी, दिल्ली-एनसीआर, कर्नाटकसह 15 ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. वितरण भागीदार, कॉपोर्रेट कार्यालये, गोदामे आणि चिनी मोबाईल कंपन्यांच्या निर्मात्यांच्या ठिकाणांवर अजूनही छापे टाकले जात आहेत.

    मोबाईल फोन व्यवसाय, कर्ज अर्ज आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित एका चिनी कंपनीवरही नुकतेच छापे टाकण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांनी हा छापा टाकला.

    Chinese mobile companies on the radar of the income tax department , raids on suspicion of tax evasion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट