• Download App
    नेहरूंनी भाबड्या स्वप्नाळू भूमिकेतून China first धोरण अवलंबले, परिणामी चीनची मुजोरी वाढली; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा घणाघात China's economy increased; External Affairs Minister Jaishankar's death

    नेहरूंनी भाबड्या स्वप्नाळू भूमिकेतून China first धोरण अवलंबले, परिणामी चीनची मुजोरी वाढली; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा घणाघात

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भोळ्या आणि भाबड्या परराष्ट्र धोरणातून China first धोरण अवलंबले. चीनशी वास्तववादावर आधारित परराष्ट्र संबंध ठेवले नाहीत, त्याचे दुष्परिणाम आजही भारताला भोगावे लागत आहेत, अशा परखड शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी नेहरूंच्या स्वप्नाळू परराष्ट्र धोरणाची चिरफाड केली. China’s economy increased; External Affairs Minister Jaishankar’s death

    “व्हाय इंडिया मॅटर्स” हे पुस्तक जयशंकर यांनी लिहून मोदी धोरणात सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रामुख्याने प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचा सविस्तर धांडोळा घेतला आहे. या पुस्तकासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखतीत त्यांना जयशंकर यांनी वर उल्लेख केलेले परखड मत व्यक्त केले.

    जयशंकर म्हणाले :

    भारताच्या चीनशी संबंधांबाबत सुरुवातीपासूनच दोन मतप्रवाह होते. एक मतप्रवाह पंडित जवाहरलाल नेहरू, तर दुसरा मतप्रवाह सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता. पंडित नेहरू आदर्शवादी भूमिकेतून परराष्ट्र धोरणाकडे पाहत होते. त्यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणात वास्तववादाचा अभाव होता. त्या उलट सरदार वल्लभभाई पटेल यांनी परराष्ट्र धोरणात वास्तववाद आणण्याचा प्रयत्न केला.

    संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या कायमच्या सदस्यत्वाचा विषय पुढे आला, त्यावेळी पंडित नेहरूंनी आदर्शवादी स्वप्नाळू आणि भाबड्या धोरणातून चीनला प्रथम सुरक्षा परिषदेचे कायमचे सदस्यत्व बहाल करायला मंजुरी दिली. नेहरूंचे हे China first धोरण होते. ते भारताच्या हिताशी तडजोड करणारे ठरले. त्यातूनच तर Chindia संकल्पनेचा उदगम झाला. तो भारताला दुय्यम भूमिकेत ढकलणारा ठरला.

    परंतु चीनने आपल्या या उदार धोरणाचा कधीच सन्मान केला नाही. उलट चीनने भारताबरोबरचे वेगवेगळे करार तोडण्यातच धन्यता मानली. आज देखील भारताचे चीन बरोबर ताणलेले संबंध हे चीनच्या द्विपक्षीय करार तोडण्याच्या प्रवृत्तीतूनच निर्माण झालेले आहेत. चीन जोपर्यंत द्विपक्षीय करार मनापासून पाळत नाही, तोपर्यंत भारताबरोबरचे त्याचे संबंध सुरळीत होणे कठीण आहे.

    मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण “India first” या वास्तवावर आधारलेले आहे. चीनच्या प्रश्नाकडे मोदी सरकार वास्तववादी भूमिकेतूनच पाहते. भविष्यकाळातही चीनबरोबरचे भारताचे संबंध वास्तववादी भूमिकेतूनच पुढे चालत राहतील. प्रामुख्याने चीनचे भारताविषयीचे धोरण कसे असेल, त्यावर भारताचा प्रतिसाद अवलंबून असेल. भारत आता स्वप्नाळू भूमिकेतून चीनला पाहिजे तसा प्रतिसाद देणार नाही.

    China’s economy increased; External Affairs Minister Jaishankar’s death

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते