बीजिंग : रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांनी अफगाणिस्तानमध्ये युद्ध केले आहे. त्यांच्याप्रमाणे चीन या संघर्षात सहभागी झालेला नाही. हा चीनच्या जमेचा मुद्दा ठरू शकतो आणि चीन त्याचा लाभ उठवू शकतो. China will help Taliban in Afganistan
अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा प्रस्थापित होण्यासाठी चीनने विधायक भूमिका बजावली आहे. आता अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत योगदान देण्याकरिता चीनचे स्वागतच असेल, असे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने म्हटले आहे.
शाहीनने चायना ग्लोबल टेलिव्हीजन नेटवर्क युरोप (सीजीटीएन) या वाहिनीला कतारमधील घरामधून व्हर्च्युअल माध्यमातून मुलाखत दिली. तो म्हणाला की, चीनची अर्थव्यवस्था आणि क्षमता अत्यंत भक्कम आहे. अफगाणिस्तानची पुनर्बांधणी, पुनर्वसन, फेरउभारणीत चीन फार मोठी भूमिका पार पाडू शकतो.
तालिबानने जवळपास संपूर्ण देश पादाक्रांत करीत सत्ता ताब्यात घेण्याचे कृत्य वैध ठरते. निवडणुकीच्या मार्गाने हे घडले नसले तरी त्यातून जनतेची इच्छा आणि पाठिंबा अधोरेखित होतो, असा दावा त्याने केला. निवडणूक हा भविष्यातील प्रश्न आहे, असे स्पष्ट करून त्याने मतदानाची शक्यता फेटाळून लावली नाही.
China will help Taliban in Afganistan
महत्त्वाच्या बातम्या